Shehnaaz Gill : दो दिल मिल रहे हैं मगर...! शहनाज गिल ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:09 IST
1 / 11‘बिग बॉस 13’ या रिअॅलिटी शो मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शहनाज गिल हिला आजही लोक ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणतात. 2 / 11जेव्हा शहनाज 16-17 वर्षांची होती, तेव्हा सगळे तिला कतरिना नावानं हाक मारायचे. मग तेव्हापासून शहनाज स्वत:ला ‘पंजाबची कतरिना’ म्हणू लागली आणि याच नावाने प्रसिद्ध झाली.3 / 11अलीकडे शहनाज फॅशन, फन मोमेंट्स आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. सध्या तिच्याबद्दल आणखी एक चर्चा कानावर येतेय. 4 / 11होय, शहजानच्या रिलेशनशिपच्या चर्चा सध्या जोरात आहेत. शहनाजला पुन्हा प्रेम मिळाल्याचं मानलं जात आहे. 5 / 11चर्चा खरी मानाल तर शहनाज टीव्हीवरचा लोकप्रिय होस्ट, कोरिओग्राफर व अॅक्टर राघव जुयालला डेट करतेय.6 / 11अलीकडे म्हणे, दोघंही एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवतात. एका प्रोजेक्टमध्ये लवकरच दोघंही एकत्र दिसणार आहेत. या सेटवर दोघांमधील बॉन्डिंग चर्चेचा विषय ठरत आहे.7 / 11शहनाज व राघव यांना आपलं रिलेशनशिप सीक्रेट ठेवायचं आहे आणि त्यामुळे आम्ही फक्त मित्र आहोत, असं दोघंही सांगत आहेत. 8 / 11काही दिवसांपूर्वी शहनाज व राघव दोघंही एकत्र व्हॅकेशनवर गेले होते. दोघांनीही एकाच लोकेशनचे वेगवेगळे फोटो शेअर केले होते.9 / 11आता शहनाज व राघव यांच्यात खरंच काही खिचडी शिजतेय की नाही, हे आम्हाला ठाऊक नाही. पण चर्चा जोरात आहेत.10 / 11शहनाज सिद्धार्थ शुक्लाच्या प्रेमात होती हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं.11 / 11सिद्धार्थ निधनातून सावरायला शहनाजला बराच वेळ लागला. पण आता ती यातून सावरल्याचं दिसतंय. आता तिच्या आयुष्यात राघव आला आल्याचं म्हटलं जात आहे. खरं काय ते लवकरच कळेलच.