Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 18:56 IST

1 / 9
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. धनश्रीशी घटस्फोट झाल्यावर त्याचे नाव आधी आरजे महावशशी जोडले गेले, त्यानंतर स्पोर्ट्स अँकर-अभिनेत्री शेफाली बग्गाशी जोडले गेले.
2 / 9
शेफाली आणि चहल एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले होते. शेफालीने त्यावर स्पष्ट केले होती की ती चहलला डेट करत नाहीये. पण आता मात्र ती एका कोट्यधीश युट्यूबरच्या प्रेमात असल्याची जोरदार चर्चा आहे.
3 / 9
शेफालीच्या केवळ अफेयरच्याच नव्हे तर लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. एका वृत्तानुसार, शेफाली कोट्यधीश युट्युबर फुकरा इंसान म्हणजेच अभिषेक मल्हानसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
4 / 9
गेल्या काही काळापासून शेफाली बग्गा आणि अभिषेक मल्हान सोशल मीडियावर अनेक रील्स शेअर करत आहेत. या छोट्या व्हिडिओंमध्ये त्यांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येते आणि चाहत्यांनाही यांची जोडी पसंत आहे.
5 / 9
सेलिब्रिटींबाबत अफेयरच्या चर्चा नेहमी रंगतात पण या दोघांबद्दल या चर्चा लग्नापर्यंत गेल्या आहेत. त्यामागे एक खास कारण आहे. सध्या सुरू असलेल्या IPLमधील RCB संघाशी या दोघांच्या लग्नाच्या चर्चांचा संबंध आहे.
6 / 9
एका रीलमध्ये फुकरा इन्सान RCBची जर्सी घालून मॅच पाहत असतो. दुसरीकडून शेफाली येते आणि त्याच्या खांद्यावर हळुवार डोके ठेवते आणि दोघेही RCBच्या विजयाचा आनंद घेऊ लागतात, असे या रीलमध्ये दिसते.
7 / 9
विशेष म्हणजे, या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिलेले दिसते की, 'जेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्हाला पत्रिका जुळवण्याची गरज नाही.' याचा चाहत्यांनी अपेक्षित अर्थ लावला असून लग्नाची चर्चा रंगली आहे.
8 / 9
इतकेच नव्हे तर, शेफालीने अभिषेकसोबत 'शीशा' या गाण्यावर एक रील पोस्ट केली होती, ज्यात त्यांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून आली होती. हे दोघेही एकमेकांसोबत सतत रील शेअर करत असल्यानेच अफेयरची चर्चा आहे.
9 / 9
अभिषेक आणि शेफालीला एकापाठोपाठ एक एकत्र रिलमध्ये पाहून चाहते असा अंदाज लावत आहेत की ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. पण त्या दोघांही अद्याप नात्यावर किंवा लग्नावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
टॅग्स :शेफाली बग्गायुजवेंद्र चहलयु ट्यूबलग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट