Join us  

आजाराला कंटाळून या अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, 5 वर्षानंतर परतली तेव्हा चेहऱ्यात झाला होता इतका बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 1:37 PM

1 / 12
शमा सिकंदरने टीव्हीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘ये मेरी लाइफ है’ या मालिकेने ती प्रकाशझोतात आली. (Photo Instagram)
2 / 12
टीव्हीवर काही मालिकांमध्ये झळकल्यावर ती अचानक गायब झाली. पण जेव्हा परतली, तेव्हा लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. (Photo Instagram)
3 / 12
काही वर्षांपूर्वी शमा बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त होती. याकाळात शमा डिप्रेशनमध्ये गेली होती. इतकी की, एकदा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. (Photo Instagram)
4 / 12
झोपेच्या गोळ्या खाऊन शमाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता.मात्र आता शमा या डिप्रेशनमधून, आजारातून बाहेर पडली आहे. (Photo Instagram)
5 / 12
शमा सिकंदर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. पण काही वर्षांपूर्वी ती अशी नव्हतीच. , तिचे जुने फोटो पाहाल तर तुम्हालाही क्षणभर विश्वास बसणार नाही. (Photo Instagram)
6 / 12
शमा सिंकदरने 'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या व्यक्तिरेखेतून ती लोकप्रिय झाली होती. (Photo Instagram)
7 / 12
'प्रेम अगन', 'मन' 'अंश' 'धूम धडाका' या सिनेमांमध्येही ती झळकली होती. (Photo Instagram)
8 / 12
विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमध्ये शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. (Photo Instagram)
9 / 12
शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. (Photo Instagram)
10 / 12
सोशल मीडियार तिचे असंख्य फॉलोअर्स असून चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo Instagram)
11 / 12
शमा सिकंदरला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)
12 / 12
टॅग्स :शमा सिंकदर