By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 13:12 IST
1 / 9 अभिनेता शाहिद कपूरने 7 जुलै 2015 रोजी मीरा राजपूतशी लग्न केले. शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. 2 / 9शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली. मीराने ना कधी शाहिदचे चित्रपट पाहिले होते ना तो स्टार आहे, याची तिला कल्पना होती. लग्न झाले आणि शाहिद मीरा एकमेकांसाठी ‘मेड फॉर इज अदर’ सिद्ध झालेत.3 / 9शाहिद कपूर आणि मीराचे अगदी धुमधडाक्यात लग्न झाले होते. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.4 / 9आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. 5 / 9लग्नाआधीच्या पहिल्याच भेटीत जवळजवळ सात तास त्यांनी गप्पा मारल्या होत्या. या भेटीनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.6 / 9शाहिद कपूरसोबत अनेक इव्हेंटमध्ये मीरा वावरते. यावेळी तिचा आत्मविश्वास बघण्यासारखा असतो.7 / 9लग्नानंतर मीरा दोन मुलांची आई बनली आहे.आई बनल्यानंतर घर आणि मुले हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय. 8 / 9शाहिद व मीरा आज बॉलिवूडचे लोकप्रिय कपल आहे.9 / 9मीरा बहुतेकदा शाहिदसोबत चित्रपटांच्या कार्यक्रमांना जात असते. तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे ती पापाराझीचीही आवडती आहे.