कसं तुटलं शाहिद-करीनाचं 4 वर्षांचं नातं; कोणी केली फसवणूक अन् कोणामुळे झाला ब्रेकअप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 12:51 IST
1 / 9बॉलिवूडमध्ये कलाकारांचं होणारं ब्रेकअप आणि पॅचअप या काही नवीन गोष्टी नाहीत. यात काही अशा जोड्या आहेत ज्या सातत्याने त्यांच्या नात्यामुळे चर्चेत येत असतात. त्यातलीच एक जोडी म्हणजे करीना कपूर-शाहिद कपूर.2 / 9बॉलिवूडमध्ये या जोडीच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. एकेकाळी ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जात होती. मात्र, अचानकपणे या जोडीने विभक्त होत सगळ्यांना धक्का दिला.3 / 9जवळपास ४ वर्ष या जोडीने एकमेकांना डेट केलं. मात्र, त्यानंतर ते विभक्त झाले. यात नेमका ब्रेकअप करण्याचा निर्णय प्रथम कोणी घेतला? कोणामुळे ते विभक्त झाले या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरीत आहेत. त्यामुळेच ब्रेकअप करण्याचा निर्णय प्रथम कोणी घेतला ते जाणून घेऊयात.4 / 9DNA च्या एका रिपोर्टनुसार, करीनामुळे हा ब्रेकअप झाल्याचं शाहिदच्या एका मैत्रिणीने सांगितलं. मात्र, त्या ब्रेकअप मागचं नेमकं कारण तिने सांगितलं नाही.5 / 9जब वी मेट सिनेमाचं शूट सुरु होतं त्यावेळी करीनाने अचानक ब्रेकअप करायचा निर्णय घेतला.6 / 9करीना एका को स्टारसोबत आऊट डोअर शूट करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिचं त्या अभिनेत्यासोबत सूत जुळलं. करीनाच्या या अफेअरची माहिती शाहिदला कळली आणि त्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले, असंही शाहिच्या मैत्रिणीने सांगितलं.7 / 9नेहा धुपियाच्या चॅट शोमध्येही शाहिदने याविषयी भाष्य केलं होतं. मी एकाविषयी बोलू शकतो. पण, दुसऱ्याविषयी जरा शंका आहे, असं म्हणत शाहिदने नाव न घेता निशाणा साधला होता.8 / 9करीनासोबत विभक्त झाल्यानंतर शाहिदने मीरा कपूरसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा सुद्धा आहे.9 / 9करीनाने सुद्धा अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं असून तिला जेह आणि तैमूर ही दोन मुलं आहेत.