Join us

SEE PICS : जादू की झप्पी ते सेल्फी...! बॉलिवूडकरांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 14:34 IST

1 / 12
निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याच्या नेतृत्वाखाली बॉलिवूडच्या युवा कलाकारांच्या १४ सदस्यीय प्रतिनिधी मंडळाने काल गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मनोरंजन क्षेत्राचे देशाच्या विकासातील योगदान, या क्षेत्रात काम करताना येणाº्या अडचणी आणि या बॉलिवूडचं भविष्य यासारख्या अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.
2 / 12
रणवीर सिंग यावेळी मोदींना ‘जादू की झप्पी’ देताना दिसला. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
3 / 12
वरूण धवनही मोदींना भेटून भारावून गेलेला दिसला.
4 / 12
सर्जिकल स्ट्राईकवर बनलेल्या ‘उरी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल यानेही पंतप्रधानांशी हस्तांदोलन केले.
5 / 12
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यानेही मोदींची भेट घेतली.
6 / 12
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने पंतप्रधानांसोबत असा फोटो काढून घेतला.
7 / 12
दिग्दर्शक रोहित शेट्टी पंतप्रधानांना भेटल्यानंतर असा आनंदात होता.
8 / 12
करण जोहर यावेळी एका नव्या अंदाजात दिसला.
9 / 12
पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी सर्व स्टार्सचे एक सेल्फी सेशनही झाले.
10 / 12
याचवेळी रणबीर कपूर आणि विकी कौशल यांचा ‘ब्रोमान्स’ पाहायला मिळाला.
11 / 12
अश्विनी अय्यर, एकता कपूर व भूमी पेडणेकर यांची सेल्फी खास ठरली.
12 / 12
आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल, आयुषमान खुराना, रोहित शेट्टी, करण जोहर, वरूण धवन, एकता कपूर, राजकुमार राव, अश्विनी अय्यर अशा कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता.
टॅग्स :नरेंद्र मोदीरणवीर सिंगकरण जोहरआलिया भटरणबीर कपूरवरूण धवन