Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : फिल्मी आहे राम कपूरची लव्हस्टोरी, अशी आहे लाईफस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 08:00 IST

1 / 13
घर एक मंदिर,कसम से, बडे अच्छे लगते है यांसारख्या अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता राम कपूर याचा आज वाढदिवस.
2 / 13
मालिकेत परफेक्ट पतीची भूमिका साकारणारा राम कपूर रिअल लाइफमध्येदेखील परफेक्ट पती आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची लव्हस्टोरी आपण जाणून घेणार आहोत.
3 / 13
‘घर एक मंदिर’ या मालिकेत रामच्या वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री त्याची रिअल लाईफ पार्टनर आहे.
4 / 13
होय, ‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच राम आणि त्याच्या भावजयीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौतमी गाडगीळ यांच्या नात्याला सुरुवात झाली आणि दोघांची ही लव्हस्टोरी पुढे लग्नाच्या वळणावरच येऊन थांबली.
5 / 13
मालिकेत एका परफेक्ट पतीची भूमिका साकारणारा राम कपूर रिअल लाइफमध्येदेखील परफेक्ट पती आहे. तो पत्नी गौतमीवर प्रचंड प्रेम करतो.
6 / 13
राम कपूरची पत्नी गौतमीदेखील एक टीव्ही अभिनेत्री आहे. राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांची भेट 2000 ते 2002 दरम्यान प्रसारित करण्यात आलेल्या ‘घर एक मंदिर’ या मालिकेदरम्यान झाली.
7 / 13
या मालिकेत गौतमी रामच्या भावजयीची भूमिका साकारत होती. पुढे राम कपूरला मालिकेतील त्याच्या भावजयीवर प्रेम जडले. परंतु हे प्रकरण इथेच थांबले नव्हतो. कारण या दोघांच्या प्रेमात अडथळे येण्यास सुरुवात झाली
8 / 13
जेव्हा रामने गौतमीला प्रपोज केले होते, तेव्हा तिने त्याला लगेचच होकार दिला होता. परंतु रामची ही लव्हस्टोरी त्याच्या घरच्यांना अजिबातच पसंत नव्हती. त्यामुळे गौतमीबरोबर लग्न करण्यासाठी रामला घरच्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. यामागचे कारण म्हणजे गौतमीचे हे दुसरे लग्न होते.
9 / 13
एका पार्टीत सर्वांसमोर रामने गौतमीला प्रपोज केले होते.
10 / 13
14 फेब्रुवारी 2003 रोजी राम व गौतमी विवाहबंधनात अडकले.
11 / 13
या दाम्पत्याला दोन मुले असून मुलगी सियाचा जन्म 2006 साली झाला तर मुलगा अक्सचा जन्म 2009 मध्ये झाला.
12 / 13
‘कसम से’ मालिकेमुळे राम कपूरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेने त्याच्या करियरला एक वेगळीच दिशा दिली. राम कपूर हा पार्टी लव्हर आहे. त्याला पार्टी करायला आवडते.
13 / 13
महागड्या गाड्यांचाही तो शौकीन आहे. रामजवळ पॉर्श गाडी आहे. त्याची किंमत जवळपास 1 कोटींच्या घरात आहे.याशिवाय त्याच्याकडे एक बीएमडब्ल्यूही आहे.
टॅग्स :राम कपूर