Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photo : ७ लाखाचं लोन काढून घेतला होता एक फ्लॅट, आज पूर्ण फ्लोरचे मालक आहेत शक्ती कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 16:23 IST

1 / 12
अजूनही कोरोनाची दहशत कमी झालेली नाही. रोज लोक या व्हायरसच्या जाळ्यात अडकत आहेत. लोक अजूनही घराबाहेर निघत नाहीयेत. अशातच अभिनेते शक्ती कपूर यांची मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या करिअरबाबत अनेक गप्पा केल्या आहेत. कालच म्हणजेच १८ ऑगस्टला त्यांच्या कुर्बानी सिनेमाला ४० वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने त्यांच्या घराचे खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (All Images Credit : m.rediff.com)
2 / 12
शक्ती कपूर पत्नी शिवांगी, मुलगी श्रद्धा आणि मुलगा सिद्धांत यांच्यासोबत मुंबईतील पाम बीच स्थित रेसीडेंशिअल कॉम्प्लेक्समध्ये राहतात.
3 / 12
१९७५ मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्याकडे रहायलाही जागा नव्हती. पण आज त्यांनी १०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलंय आणि एका अपार्टमेंटमध्ये पूर्ण फ्लोरचे मालक आहेत.
4 / 12
अभिनेते जितेंद्र यांच्या सल्ल्यावरून शक्ती कपूर यांनी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार केला. ७ लाखाचं लोन घेऊन त्यांनी त्यावेळी या बिल्डींगमध्ये ३ बेडरूमचा फ्लॅट घेतला होता.
5 / 12
१९८२ मध्ये लग्नानंतर त्यांनी त्यार फ्लोरवर दुसरा फ्लॅट घेतला. १९८४ मध्ये मुलाच्या जन्मानंतर त्यांनी तिथेच तिसरा फ्लॅट घेतला. आता ते पूर्ण फ्लोरचे मालक आहेत.
6 / 12
शक्ती कपूर यांच्या या घराचं इंटेरिअरही खासप्रकारे करण्यात आलंय. त्यांच्या स्टाइलप्रमाणेच त्यांचं घरही शानदार आहे. त्यांचं हे घर कुण्या महालापेक्षा कमी नाही. तसेच या घरातून जुहू बीचचा सुंदर नजाराही बघायला मिळतो.
7 / 12
8 / 12
9 / 12
10 / 12
11 / 12
12 / 12
टॅग्स :शक्ती कपूरबॉलिवूड