Sana Khan : "पूर्वीच्या काळी लोकांना १२ मुलं असायची"; सना खानला व्हायचंय ५-१० मुलांची आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:08 IST
1 / 10सना खान आता पती आणि मुलासोबत तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. सनाने जून २०२३ मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. आता ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.2 / 10सध्या सना तिच्या प्रेग्नेंसीचा हा टप्पा खूप एन्जॉय करताना दिसत आहे. याच दरम्यान, सनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यावर तिला खूप ट्रोल केलं जात आहे.3 / 10व्हिडिओमध्ये सना कुटुंब वाढवण्याविषयी बोलताना दिसत होती. सनाने जास्तीत जास्त मुलांची आई होण्याची इच्छा व्यक्त केली.4 / 10सना म्हणाली, 'मला जास्त मुलं झाली तर मला आनंद होईल. ५ मुलं असो, १० मुलं असो... पूर्वीच्या काळी लोकांना १२-१२ मुलं असायची.'5 / 10सनाने व्हिडिओमध्ये असंही सांगितलं की, तिचा पती मुफ्ती अनस सईद खूप सपोर्टिव्ह आणि केअरिंग आहे. जेव्हा तिची पहिली डिलिव्हरी होत होती, तेव्हा तिचा पती अनस बेशुद्ध पडला होता.6 / 10सनाने पुढे पोस्टपार्टम डिप्रेशनबाबत देखील सांगितलं आहे. ती म्हणाली, 'जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला वारंवार सांगितलं की, मी डिप्रेशनमध्ये आहे, तेव्हा कुठेतरी तुम्हाला तीच गोष्ट सतत जाणवत राहिल.'7 / 10'तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर पडा. तुमची स्पिरिच्युअलिटी वाढवा' असा सल्ला देखील सना खानने दिला आहे. 8 / 10सनाच्या या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या मुलाबद्दल काही जण तिचं अभिनंदन करत आहेत, तर काहींनी तिला यावरून ट्रोल केलं आहे. 9 / 10सना खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिच्या मुलासोबतचे आणि पतीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 10 / 10