Join us

- आणि त्यानंतर तीन दिवस सामंथाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 16:54 IST

1 / 7
सामंथा रूथ प्रभु ही साऊथची आघाडीची नायिका. जगभर तिचे असंख्य चाहते. पण तरिही चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळेच तिची अधिक चर्चा झाली.
2 / 7
2017 मध्ये तिने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्नगाठ बांधली आणि अचानक चर्चेत आली. या ग्रँड वेडिंगची अनेक दिवस चर्चा होती. पण चार वर्षांतच सामंथा व नागा यांच्यात असं काही बिनसलं की, दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला.
3 / 7
अलीकडे सामंथा ‘पुष्पा’ या सिनेमात आयटम सॉन्ग करून चर्चेत आली. ओ अंतवा हे तिचं आयटम सॉन्ग चांगलंच गाजलं. या गाण्यातील तिच्या किलर डान्सचीही चर्चा झाली.
4 / 7
सामंथा तशी मेहनती अभिनेत्री. प्रत्येक भूमिका साकारताना ती त्यात जीव ओतते. एका भूमिकेसाठी तर सामंथाने स्वत:ला चक्क तीन दिवस खोलीत कोंडून घेतलं होतं.
5 / 7
होय, ‘फॅमिली मॅन 2’ या वेबसीरिजमधील राजीची भूमिका साकारणं तिच्यासाठी सोप नव्हतं. ही भूमिका साकारण्यासाठी ती ती दिवस नुसती डॉक्यूमेंट्रीज पाहत होती. तीन दिवस तिने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं होतं.
6 / 7
‘फॅमिली मॅन 2’मध्ये सामंथाने रंगवलेल्या राजीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. तिची भूमिका मनोज वाजपेयीने साकारलेल्या श्रीकांत तिवारीच्या भूमिकेवरही भारी पडली होती.
7 / 7
सामंथा साऊथची सर्वाधिक महागडी अभिनेत्री आहे. एका सिनेमासाठी ती 2 ते 5 कोटी रूपये घेते. आज तिच्याकडे 80 कोटींची प्रॉपर्टी आहे.
टॅग्स :समांथा अक्कीनेनी