Join us
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या २८ वर्षांपासून आहे सलमानचा 'बॉडीगार्ड'! 'शेरा'चं खरं नाव माहितीये का? महिन्याला कमावतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 13:02 IST

1 / 9
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) स्वॅगच वेगळा आहे. त्याच्याशी बोलायचं तरी अनेकांना धडकी भरते. भलेभले त्याला घाबरतात. पण तो तितकाच प्रेमळही आहे हे सुद्धा अनेक दिसलं आहे. भाईजान नेहमी कडेकोट सुरक्षेत दिसतो. याचं पूर्ण क्रेडिट जातं ते त्याचा बॉडिगार्ड शेरा ला(Shera).
2 / 9
शेरा हा काही सेलिब्रिटींहून कमी नाही. गेल्या २८ वर्षांपासून तो सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो आहे. त्याची एकंदर पर्सनॅलिटीच भारी आहे. गर्दीच्या ठिकाणी सलमानच्या बाजूला शेरा असतो तेव्हा अभिनेत्याला सुरक्षेची चिंताच करावी लागत नाही.
3 / 9
सलमानचाही शेरावर जीव आहे. म्हणूनच इतकी वर्ष तो सलमानसोबत आहे. त्याच्या प्रत्येक सुखदु:खात शेरा ढालीसारखा उभा राहिला आहे. शेराचा स्वॅग आणि त्याची जीवनशैली एखाद्या बॉलिवू़ड सेलिब्रिटी प्रमाणेच आहे. सलमानकडून त्याला महिन्याला तगडी सॅलरी मिळते.
4 / 9
शेराचं खरं नाव आहे गुरमीत सिंग जॉली. माध्यम रिपोर्ट्सनुसार त्याला महिन्याला १५ लाख रुपये मिळतात. यानुसार वर्षाला तो २ कोटी रुपये कमावतो. तसंच त्याची सिक्युरिटी एजंसी आहे. याद्वारे तो अनेक सेलिब्रिटींना सुरक्षा देतो.
5 / 9
शेरा लहानपणीपासूनच तंदुरुस्त होता. त्याला बॉडी बिल्डिंगचा शॉक होता. १९८७ साली शेराने ज्युनिअर मिस्टर मुंबई आणि पुढच्याच वर्षी मिस्टर महाराष्ट्र किताब पटकावला. शेराचे वडील मुंबईत गाडी दुरुस्तीचे काम करायचे. ते त्याला प्रेमाने शेरा बोलवायचे.
6 / 9
शेरा अतिशय लक्झरी आयुष्य जगतो. त्याच्याजवळ अनेक महागड्या गाड्या आणि बाईक्सचं कलेक्शन आहे. महिंद्रा थार, कावासाकी सुपरबाईक आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी गाड्या आहेत.
7 / 9
१९९५ साली सोहेल खानने सलमानच्या परदेशी टूरसाठी शेराच्या कंपनीकडे सेवा मागितली होती. पूर्ण टूरमध्ये तूच सलमानसोबत राहायचं असं त्याने सांगितलं होतं. शेराचं काम आणि प्रामाणिकपणा बघून सलमान प्रभावित झाला आणि त्याला कायमचं कामावर ठेवून घेतलं. तेव्हापासून शेरा सलमानच्या कुटुंबाचा भागच झाला आहे.
8 / 9
सलमानकडे काम करायच्या आधी शेराने विल स्मिथ, जस्टिन बीबर, जॅकी चॅन, माइक टायसन आणि मायकल जॅक्सन सारख्या ग्लोबल स्टार्सनाही सुरक्षा दिली आहे.
9 / 9
१९९८ पासून सलमान खानला शेराची साथ मिळाली जी आजपर्यंत कायम आहे. आज भाईजान जिथे जिथे जातो तिथे शेरा दिसतोच. सलमानच्या चाहत्यांसाठी शेराही एक सेलिब्रिटीच झाला.
टॅग्स :सलमान खानलाइफस्टाइल