IN PICS : कुणीही संत नाही, मी सुद्धा दिव्या भारतीसोबत ड्रग्ज घेतलं होतं..., सोमी अलीचा आर्यनला पाठींबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 16:07 IST
1 / 8कधीकाळी सलमान खानची गर्लफ्रेन्ड म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली ( Somy Ali )आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. होय, आर्यनला पाठींबा देत तिने एक पोस्ट शेअर केली आहे.2 / 8 सोमी अलीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. आर्यन खानला पाठींबा देतानाच सोमीनं या पोस्टमध्ये एक खळबळजनक खुलासाही केला आहे.3 / 8‘मी देखील एकेकाळी दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबत ड्रग्ज घेतलं होतं. कुणीही संत नाही,’ असा खुलासा तिनं आपल्या पोस्टमध्ये केला आहे.4 / 8माझ्या मते,कित्येक मुलं ही ड्रग्ज ट्राय करतात. प्रयोग करुन पाहतात. वेश्यागमनासारखंच ड्रग्जसारखे अमली पदार्थही कधीच बंद होणार नाहीत. त्यामुळे या दोन्हींना गुन्हा मानणं बंद केलं पाहिजे. इथे कोणीही संत नाही, असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.5 / 8स्वत:च उदाहरण देत ती लिहिले, कोणीही संत नाही. हे लक्षात घ्या. मी 15 वर्षांची होते तेव्हा मी स्वत: Pot नावाचं ड्रग्ज घेतलं होतं. यानंतर ‘आंदोलन’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान दिव्या भारतीसोबतही मी ड्रग्ज घेतलं होत. पण मला या गोष्टींचा काही पश्चाताप नाही.6 / 8 न्यायव्यवस्था आपलं म्हणणं खरं करण्यासाठी आर्यनचा वापर करत आहे. तो मुलगा उगाच सहन करतोय. यापेक्षा न्यायव्यवस्थेने बलात्कार व खूनांच्या आरोपींना पकडण्यावर भर दिला तर? असा सवालही तिने केला आहे.7 / 8सरतेशेवटी, तू काहीही चुकीचं केलेलं नाहीस आर्यन. तुला न्याय मिळेल. गौरी व शाहरूखसाठी माझं मन दुखतंय, असं तिने लिहिलं आहे.8 / 8संगीता बिजलानी ही सलमानची पहिली अधिकृत गर्लफ्रेन्ड मानली जाते. संगीता व सलमानचे लग्न होता होता राहिले, हेही सगळ्यांना ठाऊक आहे. संगीतानंतर सोमी अली ही सलमानची दुसरी गर्लफ्रेन्ड मानली जाते.