Join us

Salman Khan Birthday : एकटा जीव अन् करोडोंचा मालक, सल्लूभाईच्या संपत्तीचा आकडा वाचून डोळे पांढरे होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 08:00 IST

1 / 11
बॉलिवूड इंडस्ट्रीचा ‘दबंग खान’ सलमान खान याचा आज वाढदिवस. सलमानने वयाची पन्नाशी कधीच ओलांडलीये. पण आजही तो बॉलिवूडचा महागडा अभिनेता आहे. अर्थात फक्त सिनेमे हेच त्याच्या कमाईचे माध्यम नाही. आणखीही बऱ्याच माध्यमातून तो पैसे कमावतो.
2 / 11
सलमानच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं तर त्याची एकूण संपत्ती 360 मिलियन डॉलर आहे. भारतीय रूपयांत सांगायचं तर सुमारे 2300 कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.
3 / 11
सलमान चित्रपटातून सर्वाधिक कमाई करतो. एकूण कमाईच्या 50 टक्के कमाई तो चित्रपटांतून करतो. एका चित्रपटासाठी तो सुमारे 60 कोटी रुपये घेतो.
4 / 11
सलमान केवळ अभिनेता नाही तर निर्माताही आहे. सलमान खान फिल्म्स हे त्याचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस. या बॅनरखाली त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केलीये आणि या चित्रपटांतून बक्कळ कमाई केली आहे.
5 / 11
मोठ्या पडद्यावर सलमानची जादू चालते. पण छोट्या पडद्यावरही तो लोकप्रिय आहे. बिग बॉस व अन्य शो तो होस्ट करतो. यातूनही त्याला बरीच कमाई करतो. सध्या सुरू असलेल्या ‘बिग बॉस 15’साठी भाईजानने म्हणे 350 कोटी रुपये घेतले होते.
6 / 11
बड्या बड्या ब्रँडच्या जाहिरातीतून सलमान कोट्यवधी रूपये कमावतो. एका जाहिरातीसाठी सलमान 8 ते 10 कोटी रुपये घेतो. सध्या तो अनेक ब्रँडचा अ‍ॅम्बिसीडर आहे.
7 / 11
बीइंग ह्युमन हा सलमानचा स्वत:चा फॅशन ब्रँड आहे. या ब्रँडमधूनही त्याला वर्षाला कोट्यावधी रूपयांची कमाई होते. त्याच्या कंपनीची उलाढाल 350 कोटींच्या घरात आहे.
8 / 11
सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका छोट्या 1 बीचएके फ्लॅटमध्ये राहतो. पण त्याच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहेत. नोएडा, चंदीगड, दिल्ली, मुंबई अशा अनेक ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी आहेत. पनवेलमध्ये त्याचं स्वत:चं फार्म हाऊसही आहे. शिवाय एक 5 बीएचके बंगलाही आहे.
9 / 11
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सलमान चांगली कमाई करतो. कुठल्याही ब्रँडची पोस्ट करण्यासाठी तो कोट्यावधी रुपये घेतो.
10 / 11
एकंदर काय तर सलमान एकटा कोट्यवधी रूपयांचा मालक आहे. अर्थात अद्याप सलमानचं लग्न झालेलं नाही. त्याला मुलंबाळं नाहीत. त्यामुळे या संपत्तीचा वारस कोण असणार? असा प्रश्न अनेकांना पडतो.
11 / 11
तर खुद्द सलमानने एका मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. ‘मी लग्न करो किंवा नाही, माझ्या संपत्तीवर ट्रस्टचा हक्क असेल. माझं लग्न झालं तर अर्धी मालमत्ता ट्रस्टला दान केली जाईल. जर, मी लग्न केलं नाही तर माझी संपूर्ण मालमत्ता ट्रस्टला दिली जाईल,’ असं त्याने यावेळी सांगितलं होतं.
टॅग्स :सलमान खान