Join us
Daily Top 2Weekly Top 5

Salim Khan ११ वर्षांनंतर तुटली होती सलीम-जावेद जोडी, काय झाले होते नेमके ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 09:09 IST

1 / 5
आज सलीम खान यांचा आज ८७ वा वाढदिवस. सलीम खान यांचे नाव घेतले की जावेद हे नाव आपसुकच येते. ७० च्या दशकात त्यांच्या लेखणीने रसिकांवा वेड लावले होते. अनेक प्रेक्षक तर फक्त या जोडीचे नाव ऐकून चित्रपट बघायला जात होते.
2 / 5
शोले, जंजीर, डॉन, दीवार, नाम, काला पत्थर अशा अनेक चित्रपटांचे लेखन या जोडीने केले होते. सिनेमांचे नाव सांगावे तितके कमी आहे. एकूण २३ सिनेमे त्यांनी एकत्रित लिहिले. त्यानंतर असे काय झाले की त्यांचे मार्ग वेगळे झाले.
3 / 5
एक दिवस जावेद अख्तर सलीम यांच्याकडे आले आणि त्यांनी सरळ सांगितले आता आपण वेगळे होऊया. हे ऐकून सलीम यांना धक्काच बसला. त्यांना कळलेच नाही की जावेद असे का बोलत आहे.
4 / 5
यावर सलीम यांनी फक्त इतकेच विचारले, हा विचार पाच मिनिटापुर्वी तर डोक्यात नसेल आला. यावर जावेद म्हाणाले, ते बऱ्याच काळापासून हा विचार करत आहेत. हे ऐकून सलीम त्यांच्या गाडीकडे निघाले. जावेद यांनी अडवल्यावर ते म्हणाले मी स्वत:ची काळजी घेऊ शकतो. सलीम म्हणाले प्रत्येक नात्याचा शेवट असतो.'
5 / 5
अनेक वर्षांनंतर जावेद यांनी सांगितलेा, ११ वर्ष आम्ही सोबत काम केले. एक रॅपो, विश्वास आमच्यात तयार झाला होता. अनेकदा न सांगताच आम्हाला एकमेकांच्या गोष्टी कळायच्या. मात्र हळूहळू हा रॅपो कमी होत गेला आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
टॅग्स :सलीम खानजावेद अख्तरहिंदी