Join us

PHOTOS : ट्रेंडनं भरलेल्या या जगात मला....! रिंकूने शेअर केले ‘क्लासिक’ फोटो...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:25 IST

1 / 8
‘सैराट’ या चित्रपटातून एका रात्रीत स्टार झालेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सतत चर्चेत असते. सध्या काय तर रिंकूची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
2 / 8
होय, रिंकूने लाल साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटो खास आहेतच, पण त्यापेक्षाही खास आहे ते या फोटोंना रिंकूने दिलेलं कॅप्शन.
3 / 8
होय, अख्खं जग ट्रेंण्डच्या मागे धावत असताना, ट्रेंड्स आवर्जुन फॉलो करत असताना रिंकूला मात्र यात काहीही इंटरेस्ट नाही. होय, तिने दिलेली फोटोओळ वाचून तुम्हीही हेच म्हणाल.
4 / 8
ट्रेंडनं भरलेल्या या जगात मला क्लासिक राहायचं आहे..., असं तिने म्हटलं आहे आणि यासोबत साडीतील पारंपरिक लुक शेअर केला आहे.
5 / 8
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचा हा क्लासिक लुक चाहत्यांना चांगलाच भावला आहे. तासाभरात हजारो लोकांनी तिच्या या फोटोंना लाईक केलं आहे.
6 / 8
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून रिंकू रातोरात स्टार झाली. या चित्रपटाला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला की, रिंकूला अख्खा महाराष्ट्र ओळखू लागला.
7 / 8
यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजघडीला रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही ती झकळली आहे.
8 / 8
अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू करताना रिंकूला बॉलिवूडमधल्या अनेक उत्तम दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचं सोनं केलं.
टॅग्स :रिंकू राजगुरूमराठी अभिनेता