"...तर मीच गाडी चालवून हॉस्पिटलला गेलो असतो", हल्ला झाल्यानंतर रिक्षाने का गेला? विचारणाऱ्यांना सैफचं स्पष्ट शब्दांत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:24 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीला हल्लेखोराने घरात घुसून चाकूने वार केला होता. यात सैफ गंभीर जखमी झाला होता. 2 / 10हल्ला झाल्यानंतर सैफ रिक्षाने लीलावती हॉस्पिटलला गेला होता. सैफ रिक्षाने का गेला? स्वत:च्या गाडीने का गेला नाही? ड्रायव्हर नव्हता का? असे अनेक प्रश्न विचारले जात होते. 3 / 10आता बरे झाल्यानंतर सैफने या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. दिल्ली टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं. 4 / 10'हल्ला झाल्यानंतर मी लगेचच घराच्या बाहेर पडलो आणि रिक्षाने हॉस्पिटलला गेलो. लोक सोशल मीडियावर विचारत आहेत की एवढे श्रीमंत असूनही ड्रायव्हर नव्हता का?' 5 / 10'त्यांना मी सांगू इच्छितो की इथे रात्रभर कोणीच राहत नाही. त्यांना देखील स्वत:चं कुटुंब आहे. काही लोक आमच्या घरात राहतात. पण, ड्रायव्हर राहत नाहीत'. 6 / 10'जेव्हा आम्हाला रात्री कुठे बाहेर जायचं असतं किंवा काही महत्त्वाचं काम असेल तेव्हाच आम्ही त्यांना रात्री बोलवून घेतो किंवा थांबायला सांगतो'. 7 / 10'खरं तर मी स्वत:च गाडी चालवत हॉस्पिटलला गेलो असतो. पण, सुदैवाने मला किल्ली सापडली नाही'. 8 / 10'रात्री ३ वाजता ड्रायव्हरला फोन का केला नाही? असंही लोक विचारत होते. पण, त्याला यायला वेळ लागला असता'. 9 / 10'मला कळून चुकलं होतं की मला लगेचच हॉस्पिटलला जायला हवं'. 10 / 10हल्ला झाल्यानंतर सैफवर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.