'ही' मराठमोळी बालकलाकार आहे आता टॉपची अभिनेत्री, सलमान खानसोबत केलंय काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:42 IST
1 / 9कलाकारांचे लहानपणीचे फोटो नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. जे चाहत्यांना ओळखता देखील येत नाहीत. या फोटोत दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे.2 / 9मराठमोळी लेकीनं बॉलिवूडचा 'दबंग' खान सलमानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. 3 / 9विशेष म्हणजे या अभिनेत्रीचे वडील हे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. 4 / 9जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखलं नसेल तर ही अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee Manjrekar) आहे. 5 / 9सई मांजरेकरनं २०१९ मध्ये 'दबंग ३' या सिनेमामधून बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 6 / 9बॉलिवूडसोबतच सईने तेलगू चित्रपटसृष्टीत देखील काम केलं आहे.7 / 9पण, तुम्हाला माहितेय सईचा पहिला चित्रपट हा 'दबंग ३' नव्हताच. 'दबंग ३' आधी तिनं एका मराठी चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. 8 / 9बामहेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श या चित्रपटात सईने देखील काम केलं होतं. काकस्पर्श चित्रपटापासून तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 9 / 9 सई सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रीय असते. तिचे फोटो हे चाहत्यांना कायम भुरळ घालतात.