1 / 10सई ताम्हणकर (sai tamhankar) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सईला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 2 / 10सईने गेल्या काही वर्षांमध्ये मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचं नाव कमावलं. हिंदी सिनेमेच नव्हे तर ओटीटी विश्वातही सध्या सईचा दबदबा आहे. 3 / 10सई ताम्हणकर फॅशन आयकॉन आहे. तिचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो. फॅशन फिटनेस सर्वांच्याच बाबतीत सई नेहमीच अग्रेसर राहिली आहे.4 / 10 जीम, योगा आणि योग्य आहाराचा आधार घेत सईने स्वतःला फिट अँण्ड फाईन ठेवले आहे. 5 / 10अलिकडेच सईनं २५ जून रोजी वाढदिवस ( Sai Tamhankar Birthday 2025) साजरा केला. तिनं इन्स्टाग्रामवर 'Birthday Dump!' असं कॅप्शन देत काही फोटो शेअर केले. 6 / 10या फोटोंमध्ये सईच्या आईने वाढदिवशी लेकीचं औक्षण केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मायलेकीमधील खास बॉन्डिंगही दिसून आलं. 7 / 10या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये सईनं तिच्या वयाचा (Sai Tamhankar Real Age) खुलासा केलाय. सईने कॅप्शननुसार ती आता ३९ वर्षांची ( २५ जून १९८६ ) झाली (Sai Tamhankar Turns 39)8 / 10सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच तिचा 'ग्राउंड झीरो' हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सईनं बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट तुम्ही आता घरबसल्या प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.9 / 10 'ग्राउंड झीरो'शिवाय सई 'गुलकंद' या मराठी चित्रपटातही पाहायला मिळाली. या सिनेमात सई ताम्हणकरसोबत समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे, वनिता खरात या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर तो प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे. 10 / 10सईच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत. त्याचप्रमाणे तिच्या प्रोजक्ट्सची देखील अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. लवकरच ती नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग'मध्ये पाहायला मिळणार आहे.