Join us

अभिनेत्री नव्हे तर LIC एजंट! कपूर खानदानातील 'या' व्यक्तीचा गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

By देवेंद्र जाधव | Updated: April 9, 2025 15:02 IST

1 / 7
कपूर कुटुंबातील व्यक्ती गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. पण कपूर कुटुंबातील एका व्यक्तीने अभिनेत्री न होता एक वेगळीच वाट निवडली. आज तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.
2 / 7
त्या व्यक्तीचं नाव आहे रितू नंदा. रितूने दिल्लीतील मोठे उद्योगपती राजन नंदा यांच्याशी विवाह केला होता. सासरी आर्थिकदृष्ट्या सर्व चांगलं असूनही रितूने स्वतःचा बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. LIC एजंट म्हणून रितूने करिअर निवडलं.
3 / 7
रितूने एस्कोलाईफ नावाची विमा कंपनी सुरु केली. त्याआधी रितूने निकिताशा नावाची एक किचन आणि कूकिंग संबंधी कंपनी निर्माण केली होती. परंतु या व्यवसायात त्यांना अपयश आले. पुढे त्यांनी विमा कंपनीच्या व्यवसायाकडे लक्ष दिले.
4 / 7
हळूहळू रितू यांचा विमा व्यवसायात चांगलाच जम बसला. हा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. या कष्टाचं फळ त्यांना मिळालं. त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल १७ हजार विमा पॉलिसी विकल्या. त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली.
5 / 7
मिलियन डॉलर राऊंड टेबल (MDRT) या मानाच्या संस्थेने रितू यांच्या कामाची दखल घेतली. या संस्थेने टॉप विमा एजंटला एकत्र आणलं. या संस्थेत सहभागी होणारी रितू ही पहिली भारतीय एजंट होती.
6 / 7
रितू यांचं अमिताभ बच्चन यांच्याशीही खास कनेश्कन आहे. कारण रितू यांचा मुलगा निखिल नंदासोबत अमिताभ यांची लेक श्वेताने लग्न केलंय. रितू नंदा यांचं १४ जानेवारी २०२० ला निधन झालं.
7 / 7
कॅन्सरशी रितू यांची झुंज अपयशी ठरली. त्यामुळे वयाच्या ७४ व्या वर्षी रितू यांनी अखेरचा श्वास घेतला. कपूर कुटुंबातील रितूने वेगळी वाट निवडली अन् त्यातही यशस्वी झाल्या.
टॅग्स :ऋषी कपूरराज कपूरबॉलिवूडरणबीर कपूरकरिना कपूर