Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rhea Chakraborty : ना काम, ना इज्जत, रिया चक्रवर्ती कशी कमावतेय पैसे?; म्हणाली, "काळी जादू..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:22 IST

1 / 11
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची जोरदार चर्चा रंगली होती. ती काही काळ जेलमध्ये देखील राहिली. जामिनावर सुटल्यानंतर तिचं करियर पणाला लागली होतं.
2 / 11
या घटनेला आता चार वर्षे झाली आहेत, पण आजतागायत रियाचं करियर पुन्हा योग्य मार्गावर आलेलं नाही. अलीकडेच तिच्या पॉडकास्टमध्ये रियाने तिच्या मनस्थितीबद्दल सांगितलं.
3 / 11
रियाच्या शोमध्ये सुष्मिता सेन गेस्ट म्हणून आली होती. याच दरम्यान अभिनेत्री म्हणाली - 'मला काम मिळत नसल्याने मी आता जगण्यासाठी काय करत आहे या विचाराने लोक गोंधळले आहेत.'
4 / 11
'मी चित्रपटांपासून दूर आहे. मी इतर गोष्टी करत आहे. मी मोटिव्हेशनल स्पीकिंग करत आहे. आणि यातून मी पैसे कमवत आहे. माझ्या पॉडकास्टचे नाव माझ्या आयुष्यापासून प्रेरित आहे.'
5 / 11
'माझा 'चॅप्टर 1' सगळ्यांना माहीत आहे. मी खूप भावनांमधून गेलो आहे. मला खूप वेगळ्या गोष्टी जाणवल्या आहेत. मी स्वतःचं एक वेगळं व्हर्जन पाहिलं आहे.'
6 / 11
'शेवटी, मला माझ्यातला अनेक गोष्टींची जाणीव झाली आहे. हा माझा पुनर्जन्म आहे. आणि मला तो सर्वांसोबत साजरा करायचा आहे, जो 'चॅप्टर 2' आहे.'
7 / 11
'मला असं म्हणायचं आहे की, कधी कधी तुमच्यासाठी आयुष्याची पुन्हा सुरुवात करणं चांगलं असतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम आहात आणि मला माझं हे जीवन आनंदाने जगायचं आहे.'
8 / 11
'लोक माझा तिरस्कार करत नव्हते, मी निर्माण केलेल्या माझ्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांनी तिरस्कार केला होता. लोकांना माझ्या इमेजचा त्रास होता, त्यांनी ती वेगळ्या पद्धतीने पाहिली.'
9 / 11
'आता मला वाटतं की माझ्याकडे सुपरपॉवर आहे. जेव्हा मी रुममध्ये प्रवेश करते तेव्हा काही लोक म्हणतात की, तिने काहीतरी केलं आहे, ती एक डायन आहे, ती काळी जादू करते.'
10 / 11
'आणि काही लोक म्हणतात की, ती एक खंबीर मुलगी आहे. तिच्यात एकटीने सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची हिंमत आहे. पण मला पर्वा नाही, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना मी काय आहे हे माहीत आहे' असं रियाने म्हटलं आहे.
11 / 11
टॅग्स :रिया चक्रवर्ती