Join us

रेखापेक्षाही सुंदर दिसते तिची बहीण राधा; एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री

By कोमल खांबे | Updated: October 10, 2025 11:50 IST

1 / 8
बॉलिवूडची सुप्रसिद्ध आणि सदाबहार अभिनेत्री असलेल्या रेखाचा आज ७१वा वाढदिवस आहे. अभिनयासोबत रेखा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
2 / 8
वयाची सत्तरी ओलांडली तरी रेखाचं सौंदर्य आणि तेज आजही चाहत्यांना भुरळ पाडतं. रेखाप्रमाणेच तिची बहीणही अत्यंत सुंदर दिसते.
3 / 8
रेखाच्या बहिणीचं नाव राधा असं आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत रेखा आणि राधाने अभिनयात पाऊल ठेवलं.
4 / 8
रेखाप्रमाणेच तिची बहीण राधादेखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत होती. तीदेखील एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री होती.
5 / 8
अभिनेत्री असण्यासोबतच राधाने मॉडेलिंगही केलं होतं. काही तमिळ सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
6 / 8
बॉबी या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र तिने हा सिनेमा नाकारला.
7 / 8
प्रसिद्धी आणि करिअरमध्ये यश मिळूनही राधाचं मन रमलं नाही. त्यामुळे तिने सिनेइंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
8 / 8
बालपणीचा मित्र असलेल्या उस्मान सय्यद यांच्याशी लग्न करून राधा परदेशात स्थायिक झाली. आता रेखासोबत अनेक इव्हेंटला ती दिसते.
टॅग्स :रेखासेलिब्रिटी