1 / 12प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांची आज पुण्यतिथी. आजच्याच दिवशी म्हणजे 18 मे 2017 रोजी हृदयविकारामुळे त्यांनी जगाला निरोप घेतला होता.2 / 12बॉलिवूडमध्ये आईची भूमिका रंगवणा-या मोजक्या अशा आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये रिमा लागू यांचे नाव घेतले जाते.3 / 12रिमा लागू आज आपल्यात नाहीत, पण त्या त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांमध्ये राहतील.4 / 12रिमा लागू यांचे मूळ नाव नयन भडभडे असे होते. 5 / 12 नाटकांत काम करतानाच त्या विवेक लागू यांना भेटल्या, दोघांनी प्रेमविवाह केला आणि नयन भडभडेच्या रिमा लागू झाल्यात.6 / 12रिमा यांनी बाल कलाकार म्हणून 10 ते 12 चित्रपट केले. पाचवीपासून रिमा लागू यांच्या आईने त्यांना अभ्यासाकडे लक्ष देता यावे म्हणून पुन्हा अभिनय वगैरे पूर्ण बंद केला आणि अकरावीपर्यंत त्या पुन्हा रुपेरी पडद्यापासून दूर गेल्या.7 / 12अकरावीनंतर मुंबईत आल्यानंतर त्यांना फुलराणी हे नाटक मिळाले. 8 / 12फुलराणी नाटकानंतर रिमा यांना श्याम बेनेगल यांच्याकडून एका जाहिरातीत संधी मिळाली. एकूण सात भाषांमध्ये असलेली ही साबणाची जाहिरात म्हणजे रिमा लागू यांची पहिली जाहिरात होती.9 / 12तुम्हाला माहित नसेल पण करिअरच्या सुरुवातीला रिमा बँकेत नोकरीला होत्या. पण मुलगी झाल्यानंतर तिला सोडून त्यांना बँकेत कामाला जाणे त्यांना कठीण जाऊ लागले. त्याचा मानसिक त्रास रिमा यांना व्हायचा. त्यामुळे त्यांनी आधी बँकेची नोकरी सोडली. 10 / 12मुलगी जवळपास दोन वर्षांची झाल्यानंतर रिमा लागू अभिनयाकडे वळल्या आणि त्यावेळी आता हेच आपले करिअर असे त्यांचे ठरले. 11 / 12 80 च्या दशकात त्या बॉलिवूड सिनेमांकडे वळल्या. बॉलिवूडच्या पडद्यावरची एक ग्लॅमरस आई म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.12 / 12अभिनेता विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या रिमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षांनंतर दोघेही विभक्त झाले.