Rashami Desai : "मी पैशासाठी बिग बॉस केलं, आर्थिक संकट पाहिलंय"; रश्मी देसाईने सांगितला वाईट काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:58 IST
1 / 10'उत्तरन'मधून घराघरात लोकप्रिय झालेली रश्मी देसाई अलीकडेच 'हिसाब बराबर' चित्रपटात दिसली. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. रश्मीने आर माधवनसोबत स्क्रीन शेअर केली.2 / 10टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रश्मीने आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या दिवसांची आठवण काढली. तो अभिनेत्रीच्या आयुष्यातील एक वाईट काळ होता.3 / 10रश्मी म्हणाली- 'मला माझे वाईट दिवस आठवायचे नाहीत. मी बऱ्याच गोष्टी झेलल्या आहेत आणि एकटीनेच त्या हाताळल्या आहेत.' 4 / 10'माझ्यासोबत हे सर्व घडत होतं तेव्हा मी ते कधीही कोणालाही सांगितलं नाही.'5 / 10'मला बिग बॉसचा फॉरमॅट कधीच समजला नाही. मी तो शो फक्त पैशांसाठी केला होता. त्यावेळी मला पैशांची खूप गरज होती. 6 / 10'मी बिग बॉस केल्याबद्दल मला आनंद आहे. कारण माझ्या आयुष्यातील काही चॅप्टर त्यानंतर पूर्ण झाले, नाहीतर वाईट वेळी त्याचा अंत झाला असता.' 7 / 10'कदाचित मी तुमच्या लोकांमध्ये नसते. मी बिग बॉस केलं हे फार चांगलं झालं आहे.'8 / 10'२०१८, २०१९ आणि २०२० ही वर्षे माझ्या आयुष्यातील अशी वर्षे होती ज्यात मला काय चाललं आहे ते समजत नव्हतं' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.9 / 10रश्मी देसाईचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 10 / 10