जन्म होताच अभिनेत्रीची हॉस्पिटलमध्ये झालेली अदला बदली! डोळ्यांमुळे पटली ओळख, नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:11 IST
1 / 9आपल्या लाडक्या आणि आवडत्या सेलिब्रिटीबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सेलिब्रिटींचे लहानपणीचे किस्से ऐकायलाही चाहत्यांना मजा वाटते. 2 / 9एका अभिनेत्रीची जन्मानंतर हॉस्पिटलमध्येच अदलाबदली झाली होती. कोण होती ही अभिनेत्री चला जाणून घेऊया. 3 / 9ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची एकेकाळची टॉपची हिरोईन राणी मुखर्जी. जन्म होताच राणी मुखर्जीची हॉस्पिटलमध्ये बदली झाली होती. 4 / 9पण, आईच्या सतर्कतेमुळे राणी मुखर्जी पुन्हा तिच्या कुटुंबाकडे गेली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. 5 / 9अभिनेत्रीच्या डोळ्यांमुळे ही राणी मुखर्जी नसल्याचं तिची आई कृष्णा मुखर्जी यांनी ओळखलं. अभिनेत्रीनेच हा किस्सा मुलाखतीत सांगितला होता. 6 / 9राणी मुखर्जीचे डोळे ब्राऊन रंगाचे होते. त्यामुळे दुसरं बाळ हातात येताच हे बाळ आपलं नसल्याचं राणी मुखर्जीच्या आईने ओळखलं. 7 / 9'ही माझी मुलगी नाही. माझ्या मुलीचे डोळे ब्राऊन आहेत. माझ्या मुलीला शोधून आणा', असं म्हणत कृष्णा मुखर्जींनी हॉस्पिटलच डोक्यावर घेतलं. 8 / 9त्यानंतर मग शोधाशोध सुरू झाली आणि राणी मुखर्जी एका पंजाबी कुटुंबाकडे सापडली. 9 / 9बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिलेल्या राणी मुखर्जीचा आज वाढदिवस आहे.