Join us

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रणबीरने अंगावर घेतली 'स्पेशल' शाल; किंमत आलियाच्या साडीपेक्षाही दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 17:02 IST

1 / 6
Ranbir Kapoor Shawl, Alia Bhatt - Ram Mandir Pranpratishtha : आलिया भट्टने २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिची साडी हा चर्चेचा विषय ठरला. तिच्यासोबत तिचा पती रणबीर कपूरही या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला. या सोहळ्यात त्यांच्या पारंपारिक लूकची खूप प्रशंसा झाली.
2 / 6
आलियाने निळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर रामायणातील काही महत्त्वाच्या क्षणांचे नक्षीकाम केले होते. तर धोती कुर्ता लूकमध्ये रणबीरही छान दिसत होता. रणबीरने घातलेल्या कुर्त्यावर एक नक्षीदार शाल घेतली होती. त्या शालीची चर्चा झाली आणि तिच्या किमतीवरूनही बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. जाणून घेऊया त्याबाबत...
3 / 6
बी-टाऊनचे आवडते कपल आलिया आणि रणबीरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलियाचा साडीतील फोटो शेअर करून लोक तिचे कौतुक करत आहेत. अभिनेत्रीच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच तिनेही मॅचिंग रंगाची शाल अंगावर घेत तिचा लूक पूर्ण केला होता.
4 / 6
त्याशिवाय तिच्या केसांची वेणी स्टाइल वेगळ्याच प्रकारची असल्याने तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले. एका माहितीनुसार, आलियाची साडी तयार करण्यासाठी सुमारे १० दिवसांचा कालावधी लागला आणि तिच्या साडीची किंमत सुमारे ४५ हजार असल्याचे सांगण्यात आले आहे.
5 / 6
आलियाच्या साडीपेक्षा रणबीरची पश्मीना शाल अधिक महाग असल्याचे बोलले जात आहे. आलियाच्या साडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. पण, रणबीर कपूरच्या धोती कुर्ता लूकने चाहत्यांची मने जिंकली. त्याने या पारंपारिक पोशाखासोबत हातमागावर विणलेली पश्मीना शाल घेतली होती.
6 / 6
त्यावर केलेली कारागिरी पाहून लोक फारच प्रभावित झाले. रणबीरने घातलेली शाल आलियाच्या साडीपेक्षा खूपच महाग होती असे सांगण्यात येत आहे. तसेच, या एका शालीची किंमत सुमारे १ लाख ७ हजार इतकी असते, असेही सांगितले जात आहे.
टॅग्स :राम मंदिररणबीर कपूरअयोध्याआलिया भट