By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 10:51 IST
1 / 8मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) दिवसांपूर्वीच लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली. ती रेड कार्पेटवर येताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. कारण राधिका प्रेग्नंट होती.2 / 8राधिकाने सोशल मीडियावर प्रेग्नंसीविषयी कोणताच उल्लेख केला नव्हता. तर थेट फिल्म फेस्टिव्हलमध्येच तिच्या प्रेग्नंसीचा खुलासा झाला. यानंतर आता एका मुलाखतीत तिने हा सर्व प्रवास उलगडला आहे. 3 / 8नुकतंच एका मुलाखतीत राधिका गंमतीत म्हणाली की तिला प्रेग्नंसी रिव्हील करायची नव्हती. पण बेबी बंप खूप मोठा होता ज्यामुळे ते समोर आलंच. एकंदर गरोदरपणाच्या या काळावरही तिने भाष्य केलं.4 / 8राधिका म्हणाली, 'मी अजिबातच ठीक नाहीये. गेल्या पाच दिवसांपासून मी झोपलेही नाही. प्रेग्नंसीचे शेवटचे तीन महिने खूप कठीण आहेत. त्यामुळे मला जराही झोप मिळत नाही. माझा आई होण्याचा काही विचार नव्हता. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट आहे. गरोदर असणं, त्यात काय काय होतं याचाही मी कधीच विचार केला नव्हता.'5 / 8काही महिलांचा प्रेग्नंसीचा काळ सहज जातो. पण काही महिलांसाठी तो कठीणही असतो. तुमचं शरीर सतत अनेक बदलांना सामोरं जात असतं. त्यामुळे हा प्रवास कठीण आहे. मी खोटं बोलणार नाही पण एक अॅक्टिव्ह व्यक्ती म्हणून हा प्रवास मानसिक आणि शारिरीकरित्या आव्हानात्मक आहे.'6 / 8पहिल्या तीन महिन्यात तर मला ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन याचा त्रास झाला. मी सलग तीन महिने ४० डिग्री तापमानात सेटवर काम करत होते. मला सगळे म्हणायचे तू आई होणार आहेस आनंदी दिसलं पाहिजे. तेव्हा मला त्यांना एक पंच मारावा वाटायचा. इथे मला त्रास होतोय आणि हे लोक आनंदी राहायची गोष्ट करत आहेत.'7 / 8प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात मी दोन सिनेमांचं शूट करत होते. यातील एका सिनेमाचा सेट अजिबातच सहकार्य करणारा नव्हता. एक गरोदर व्यक्ती तुमच्यासोबत आहे याची साधी त्यांना जाणीवही नव्हती. तर दुसऱ्या सिनेमाचा सेट अगदीच विरुद्ध होता. तिथे माझी खूप काळजी घेतली गेली. असे दोन अनुभव मला आले.'8 / 8राधिका आपटे पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. तर मार्च महिन्यापासून ती लगेच कामही सुरु करणार आहे. राधिकाचा पती बेनेडिक्ट टेलर हा लंडनमध्ये म्युझिशियन आहे.