By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:35 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे नुकतीच आई झाली आहे. राधिकाने काही दिवसांपूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 2 / 10लेकीबरोबरचा फोटो शेअर करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता राधिकाने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. 3 / 10राधिकाने बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. मुलीच्या जन्मानंतर राधिकाने मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. 4 / 10मुलीला जन्म देण्याच्या एक आठवडा आधी हे मॅटर्निटी फोटोशूट केल्याचं राधिकाने म्हटलं आहे. 5 / 10जाळीदार ड्रेसमध्ये राधिकाने बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. मॅटर्निटी फोटोशूटमध्येही राधिकाने बोल्डनेसच्या सर्व सिमा पार केल्या आहेत. 6 / 10'प्रेग्नंन्सी हा अपघात नव्हता. पण, तरीदेखील ते आमच्यासाठी शॉकिंग होतं', असं तिने म्हटलं आहे. 7 / 10'मी असं कधीच स्वत:ला पाहिलं नव्हतं. माझं वजन वाढलं होतं. माझ्या शरीराला सूज आली होती. आता डिलीव्हरीनंतर दोन आठवड्यांनी माझं शरीर पुन्हा वेगळं दिसत आहे'. 8 / 10'बहुतेक महिलांना गरोदरपणात त्रास होतो. खरं तर मेनोपॉजसारखी ही अवस्था असते'. 9 / 10'पण, एकीकडे मासिक पाळी आणि मेनोपॉजबद्दल बोलताना आपण गरोदरपणाचा कौतुक करतो.'10 / 10'एका बाळाला जन्म देणं ही सुंदर गोष्ट आहे. पण, गरोदरपणातील कठीण काळाबद्दल कोणीच भाष्य करत नाही'.