'पुष्पा' फेम सामंथा प्रभूपासून वेगळा होताच नागा चैतन्यच्या आयुष्यात आली नवी सुंदरी, बॉलिवूडमधील आहे प्रसिद्ध चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:02 IST
1 / 8साउथ स्टार नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या विभक्त झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.2 / 8हळूहळू दोघेही त्यांच्या जीवनात सावरताना दिसत आहेत आणि आता असे दिसते आहे की नागा चैतन्यला त्यांचे नवीन प्रेम सापडले आहे. 3 / 8. मेड इन हेवन सीरिज फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालाला नागा चैतन्य डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघे नुकतेच नागा चैतन्यच्या नवीन घरात एकत्र दिसले.4 / 8नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली. त्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून त्यांचे नाते संपुष्टात आणले.5 / 8पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, नागा चैतन्य शोभितासोबत त्यांच्या नवीन घरात दिसला होता. नागा चैतन्यने हैदराबादमध्ये असलेल्या जुबली हिल्समध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेतली होती, ज्याचे बांधकाम अद्याप सुरू आहे.6 / 8सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या नवीन घरात चैतन्य आणि शोभिता एकमेकांसोबत खूप आरामदायक दिसत होते. चैतन्य शोभिताला त्याच्या घरी घेऊन गेला होता. काही तास एकत्र घालवल्यानंतर ते त्याच गाडीतून निघाले.7 / 8नागा चैतन्य आणि शोभिता एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोघेही गेल्या काही आठवड्यांपासून एकमेकांसोबत बराच वेळ घालवत आहेत. यापूर्वी मेजर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नागा चैतन्यला शोभिताच्या हॉटेलमध्ये अनेकदा पाहिले होते. शोभितानेही तिचा वाढदिवस तिच्या जवळच्या मित्रांसोबत हैदराबादमध्ये साजरा केला.8 / 8नागा चैतन्य आणि शोभिता यांची ही जवळीकता त्यांच्या वाढत्या प्रेमाचे लक्षण आहे की त्यांच्या मैत्रीचे, हे येणारा काळच सांगेल. सध्या या दोन्ही कलाकारांनी या वृत्तांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.