ना आलिया ना दीपिका.. 'या' अभिनेत्रीनं एका सिनेमासाठी ३० कोटी घेतलंय मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:37 IST
1 / 10 बॉलिवूडमध्ये (Bollywood) कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. अशातच एका अभिनेत्री एका सिनेमासाठी १० नाही २० नाही तब्बल ३० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. 2 / 10बरं ही अभिनेत्री ना आलिया (Aalia) आहे ना दीपिका (Deepika) आणि नाही कतरिना. 3 / 10या अभिनेत्रीनं बॉलिवूडमधील स्टार्स शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर सोबतही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एवढंच काय तर तिचं किंग खान शाहरुखसोबत लिंकअपच्याही चर्चा रंगल्या होत्या. 4 / 10तर ही अभिनेत्री आहे 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा. अभिनेत्री भारतातील सर्वात जास्त महागडी अभिनेत्री ठरली आहे. 5 / 10बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, प्रियंका ही एसएस राजामौली यांचा 'एसएसएमबी29'(Priyanka Chopra to star in SS Rajamouli's SSMB29) या चित्रपटात महेश बाबूसोबत झळकणार आहे. 6 / 10या सिनेमासाठी तिनं तब्बल ३० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. 7 / 10एसएस राजामौली यांच्या सिनेमातून प्रियंका चोप्रा इतक्या वर्षांनंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक करणार आहे. 8 / 10'एसएसएमबी29' अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपटात प्रियंका आणि महेश बाबूसोबत जॉन अब्राहमदेखील झळकणार आहे. 9 / 10या सिनेमाची अधिकृत घोषणा कधी करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.10 / 10दरम्यान, प्रियंकाची एकूण संपत्ती (Priyanka Chopra Net Worth) ६५० कोटी आहे. फक्त सिनेमेच नाही तर, इतर मार्गांनी देखील अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची माया कमावते.