Join us
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Chopra: ग्लॅमरस दिसण्यासाठी प्रियंका चोप्राला प्लास्टिक सर्जरी करणं पडलं होतं महागात, करिअर संपुष्ठात येण्याची वाटत होती भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 06:00 IST

1 / 8
बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या सध्याच्या अनेक अभिनेत्रींनी ग्लॅमरस दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत.
2 / 8
राखी सावंत, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते अगदी जान्हवी कपूर पर्यंत अनेक अभिनेत्री आपल्या चेहऱ्याची सर्जरी करू घेतली. पण फार कमी अभिनेत्री आहेत ज्या आपल्या सर्जरीबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाल्या आहेत.
3 / 8
त्यातील एक अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकानं तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे.
4 / 8
प्रियांकाने तिच्या सर्जरीचा एक वेदनादायक किस्सा सांगितला होता. तिच्या नाकाच्या सर्जरीनंतर तिचा चेहरा न बघण्यालायक झाला होता. तिचा चेहरा पाहून तिची आई देखील खूप घाबरली होती.
5 / 8
प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत तिच्या नाकाच्या सर्जरीबद्दल सांगितले. ती म्हणाली की, सर्जरीच्या वेळी अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे मी घाबरून गेले. माझा चेहरा पूर्णपणे बदलून गेला होता. माझ्या चेहऱ्याची कॉस्मेटिक सर्जरी होती. मी नॉस्टल कॅविटी कॉस्मेटिक सर्जरी केली.
6 / 8
डॉक्टर माझ्या पॉलीपची सर्जरी करत होते तेव्हा माझ्या नाकाचा एक कट गेला. त्या कटने माझा लुकच बदलला. नाकावरून बॅन्डेज काढण्यात आले तेव्हा मी आणि आई खूप घाबरले. माझे आधीच नॅचरल नाक गायब झाले होते. माझा सगळा लुक बदलला, असे प्रियंकाने सांगितले.
7 / 8
खरेतर प्रियंकाला सर्जरीनंतर तिचे करिअर संपुष्ठात येईल, अशी भीती वाटत होती. मात्र तिच्या चेहऱ्याची सर्जरी केल्यानंतर तिच्या करिअरमध्ये महत्त्वाचे बदल झाले. त्यानंतर अनेक बॉलिवूड चित्रपटात तिने काम केले.
8 / 8
प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिची सिडाटेल ही वेबसीरिज लवकरच भेटीला येणार आहे.
टॅग्स :प्रियंका चोप्रा