Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारावीत असताना 'चॉकलेट बॉय'च्या प्रेमात पडली; अन् अशी सुरु झाली प्रिया बापट आणि उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 11:42 IST

1 / 11
मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्त प्रियाने सोशल मीडियावर उमेश कामतसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर केलेत.
2 / 11
जर तरची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने प्रिया आणि उमेश सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्याच्या लग्नाच्या वाढदिवसनिमित्त आम्ही तुम्हाला प्रिया आणि उमेश कामतची लव्हस्टोरी सांगणार आहोत.
3 / 11
2011 साली दसऱ्याच्या दिवशी उमेश कामत व प्रिया बापट लग्नबेडीत अडकले. त्याआधी बरीच वर्षे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. खरं तर प्रियानेच पुढाकार घेत उमेशला लग्नासाठी विचारलं होतं. पण उमेशने तिला होकार द्यायला तिला बरीच वाट बघायला लावली. प्रिया बारावीत असताना ती उमेश कामतच्या प्रेमात पडली. प्रिया आणि उमेश यांच्या वयात आठ वर्षांचं अंतर आहे.
4 / 11
‘भेट’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. पण या चित्रपटात दोघांचा एकही सीन नव्हता. चित्रपटाच्या प्रिव्ह्यूला दोघांची पहिली भेट झाली होती. पण तिथेही दोघे एकमेकांशी फार काही बोलले नव्हते.
5 / 11
पुढे ‘आभाळमाया’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. पण तरिसुद्धा भेटीगाठी असं काहीही नव्हतं. फक्त दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले होते इतकंच.
6 / 11
यानंतर ‘वादळवाट’ या मालिकेच्या सेटवर मात्र दोघांची गाडी जरा पुढे सरकली. दोघांची चांगली ओळख झाली आणि मग फोन, मॅसेज असं सगळं सुरू झालं. हळूहळू भेटीगाठीही सुरू झाल्यात.
7 / 11
त्यावेळी रात्री 9 ते सकाळी 9 असं कॉलिंग फ्री असायचं. याचा उमेश व प्रियाने पुरेपूर उपभोग घेतला. तोपर्यंत दोघंही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. पण बोलायला कुणीच तयार नव्हतं. अखेर प्रियानेच पुढाकार घ्यायचं ठरवलं.
8 / 11
उमेश तर काहीच बोलत नाही, हे बघून एकेदिवशी तिनेच त्याला विचारलं. मला तू आवडतोस, तुझं काय? असं तिने विचारलं. तो दिवस होता 9 ऑगस्ट. पण उमेशने काहीच उत्तर दिलं नाही. मला वेळ दे, एवढंच तो तिला म्हणला.
9 / 11
पण यानंतर प्रियाच्या वाढदिवशीच म्हणजे 18 सप्टेंबरला उमेशने त्याचा होकार कळवला. होकार देण्यासाठी त्याने जवळजवळ एक महिना प्रियाला वाट पाहायला लावली होती.
10 / 11
एकमेकांना होकार कळवल्यावर दोघांनीही घरी लगेच सांगितलं नव्हतं. यानंतर घरी सांगितलं तर, उमेशकडून काहीच अडचण नव्हती. पण प्रियाच्या घरून विरोध होता. कारण उमेश त्यावेळी इंडस्ट्रीत तितकासा स्थिर झालेला नव्हता त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी प्रियाच्या घरातून विरोध होता.
11 / 11
कुटुंबाच्या विरोधात काही करायचं नाही असं दोघांनीही ठरलं होतं. त्यामुळे त्यांचा होकार मिळवण्यासाठी त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. जवळजवळ 5 वर्षे दोघांनीही प्रतीक्षा केली. हळूहळू दोघांच्या नात्याची इंडस्ट्रीतही चर्चा सुरू झाली. अखेर प्रियाच्या घरचेही तयार झालेत.
टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत