By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:55 IST
1 / 7अभिनेत्री प्रिया बापट सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे तिचं बोल्ड अन् ग्लॅमरस फोटोशूट. होय, डेनिम जॅकेटमध्ये प्रियाने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.2 / 7 डेनिम जॅकेट आणि जीन्समधील अनेक हॉट फोटो तिने शेअर केले आहेत. ताज्या फोटोंमध्ये प्रिया बॅकलेस लुकमध्ये दिसतेय. डेनिम जॅकेट वापरत तिने बोल्डनेसचा तडका दिला आहे. 3 / 7 प्रियाने याआधी देखील डेनिम लुकमधील काही फोटो शेअर केले होते, ज्यातून तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ताज्या फोटोंची मात्र वेगळ्याच कारणानं चर्चा आहे. 4 / 7होय, प्रियाच्या या फोटोंवर चाहत्यांनी धम्माल कमेंट्स केल्या आहेत. ओ..., तुम्ही शर्ट उलट घातलंय, अशी मजेदार कमेंट एकाने केलीये.5 / 7हे फोटो पाहून ढोल चित्रपटाचा राजपाल यादव आठवल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. शर्ट उलटा का घातला? दीपिकाचं भूत तुझ्याकडे आलं की काय? आहेस तशीच आवडते आम्हाला, अशी कमेंट एका युजरने केली आहे.6 / 7उलटा शर्ट का घातला मॅम, सरळ करा आणखी सुंदर दिसाल, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. एवढ्या मोठ्या झाल्या तरी कपडे घालता येत नाही, अशी भन्नाट कमेंट एकाने केली आहे.7 / 7 अनेकांना प्रियाचा हा लूक जबरदस्त आवडला आहे. मॅझिकल, हॉट, ब्युटिफुल, कडक अशा शब्दांत अनेक चाहत्यांनी तिच्या या लुकचं कौतुक केलं आहे.