Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आजकालचं प्रेम म्हणजे 'रडायला खांदा' पण माझ्यासाठी मात्र..."; प्राजक्ता माळीने हिशेबच करून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 15:53 IST

1 / 9
सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. प्राजक्ता लग्न कधी करणार असा प्रश्न तर अनेकजण तिला सतत विचारत असतात. मात्र प्राजक्ताचा इतक्यात लग्न करण्याचा विचार दिसत नाही.
2 / 9
सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय शोचे सूत्रसंचालन करत आहे. शोमधील कलाकारांप्रमाणेच तिचं सूत्रसंचालनही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे.
3 / 9
तसंच प्राजक्ताने नुकतीच प्लॅनेट मराठीवरील 'रानबाजार' या सिरीजमध्ये दिसली. यामध्ये तिने पहिल्यांदाच अत्यंत बोल्ड पात्र साकारलं. याशिवाय तिने पावनखिंड, लकडाऊन, पांडू या सिनेमांमध्ये भूमिका केली.
4 / 9
प्राजक्ताला नुकताच झी युवा सन्मान तेजस्वी चेहरा हा पुरस्कार मिळाला. घरातले दोन कोपरे कौतुकाने भरत चाललेत ह्याचा खूप आनंद आहे. पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की प्रोत्साहन मिळतं, उत्साह वाढतो असं कॅप्शन तिने दिलं आहे.
5 / 9
दरम्यान प्राजक्ताने पुरस्कार स्वीकारल्यानंतर एका मुलाखतीत प्रेमाविषयी विचार व्यक्त केले. प्रेम की करिअर प्राजक्तासाठी नक्की काय महत्वाचं याचं उत्तर तिने मुलाखतीतून दिलं आहे.
6 / 9
प्राजक्ता म्हणाली, 'प्रेम जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. जगातली सगळ्यात शक्तिशाली गोष्ट. मोठ्यातला मोठा डोंगरही हलवण्याची प्रेमात ताकद आहे. अर्थात सध्याचं अवतीभोवती आपण बघतो ते प्रेम मला फार उथळ वाटतं. आर्थिक स्थिरता, भावना, रडायला खांदा पाहिजे, समाजाला दाखवायला काहीतरी पाहिजे याकडे थोडंसं झुकतंय.
7 / 9
ती पुढे म्हणाली, पण माझा प्रेमावर विश्वास आहे. करिअर की प्रेम हे निवडणं अवघड आहे कारण करिअर फक्त करिअर नाहीए माझ्यासाठी तर ती अन्न, वस्त्र, निवारा आणि कला अशी ती मूलभूत गरज आहे. माझी ती जीवनपद्धती आहे.'
8 / 9
प्राजक्ताचं हे उत्तर ऐकून तिचं तिच्या कलेवरचं असलेलं प्रेम दिसून येतं. प्राजक्ता फक्त अभिनेत्रीच नाही तर व्यावसायिकाही आहे. तिने नुकताच स्वत:चा 'प्राजक्तराज' हा ज्वेलरी ब्रॅंड सुरु केला आहे ज्याला सध्या उत्तम प्रतिसाद मिळतोय.
9 / 9
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या ब्रेकअपविषयीही सांगितलं होतं. 'वाय' सिनेमावेळी तिचा ब्रेकअप झाल्याचा खुलासा तिने केला होता.मात्र प्रेमावर अजुनही विश्वास आहे सध्या करिअरवर फोचक असल्याचं तिने स्पष्ट केलं.
टॅग्स :प्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्रारिलेशनशिप