Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prajakta Mali : प्राजक्ता माळी कशी बनली 'सोनसळा', पहिल्या सिनेमामागे आहे रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 09:18 IST

1 / 9
प्राजक्ता माळी सध्याची महाराष्ट्राची क्रशच. तिच्या गोड हसण्यावर, अभिनयावर एकूणच तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा असतात. तिचे सोशल मीडियावरील पारंपारिक असो किंवा वेस्टर्न लुक तर नेहमीच व्हायरल होत असतात.
2 / 9
नुकताच प्राजक्ताने 'प्राजक्तराज' हा ज्वेलरी ब्रॅंड सुरु केला. ज्याचे अनावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. या ब्रॅंडमध्ये तुळजा, म्हाळसा आणि सोनसळा म्हणजेच सोनं चांदी आणि इमिटेशन अशा तीन प्रकारांमध्ये दागिने उपलब्ध आहेत.
3 / 9
प्राजक्ताने या दागिन्यांवरील अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात तिने अगदी नऊवारी साडी नेसून मराठमोळा लुक केला आहे. याला चाहतेही पसंत करत आहेत.
4 / 9
'सोनसळा' या दागिन्यांच्या प्रकाराचं नाव खरं तर प्राजक्ताच्या पहिल्या सिनेमातून घेतलं आहे. प्राजक्ताचा पहिला सिनेमा कोणता आणि त्यातली तिची भूमिका कोणती होती माहित आहे का
5 / 9
2008 मध्ये आलेला 'तांदळा'हा प्राजक्ताचा पहिला सिनेमा होता ज्यात तिला तरुणपणीच्या आसावरी जोशी यांची भूमिका साकारायची होती. यात तिच्या भूमिकेचे नाव 'सोनसळा' होते.
6 / 9
'तांदळा 'हा सिनेमा प्राजक्ताला कोणतीही ऑडिशन न देताच मिळाला होता. प्राजक्ताच्या डान्स क्लासमध्ये एक मुलगा होता जो सिनेमासाठी काम करत होता. तो तरुणपणीच्या आसावरी जोशी यांचा चेहरा हवा होता.
7 / 9
एके दिवशी तो मुलगा प्राजक्ताला रस्त्यात भेटला आणि एकदम थबकला. तो तिला म्हणाला,' तू तर अगदी आसावरी जोशींसारखीच दिसते. या पत्त्यावर जा आणि ऑडिशन देऊन ये किंवा नुसतंच तोंड दाखवून ये.'
8 / 9
यानंतर प्राजक्ता ऑडिशनसाठी गेली आणि तिला पाहताच ते म्हणाले, पुढच्या आठवड्यात वेळ आहे का ? यावर ती म्हणाली, कॉलेज आहे पण मी बंक करेन.' अशा रितीने प्राजक्ताला पहिला सिनेमा मिळाला.
9 / 9
या सिनेमात प्राजक्ताची अगदीच छोटी भूमिका होती. तिला केवळ फ्लॅशबॅकमध्ये काम होतं. मात्र या माध्यमातून तिचं सिनेसृष्टीत पदार्पण झालं.
टॅग्स :प्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेता