मृत्यूपूर्वी चित्राने शेअर केली होती इन्स्टास्टोरी, 12 तासांत असे काय घडले की तिने जीवन संपवले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 13:34 IST
1 / 9तमिळ मनोरंजन विश्वातील टीव्ही अभिनेत्री वीजे चित्राने कथितरित्या आत्महत्या केल्याने तमिळ चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये या 28 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला. 2 / 9काही दिवसांपूर्वीच उद्योगपती हेमंत यांच्यासोबत चित्राचा साखरपुडा झाला होता. आपल्या भावी पतीसोबत चित्रा हॉटेलमध्ये मुक्कामास होती.3 / 9 मृत्यूच्या अगदी 12 तासांपूर्वी चित्राने इन्स्टास्टोरी शेअर केली होती. या इन्स्टाग्राम स्टोरीत चित्रा कमालीची आनंदी दिसत आहे. ती कोणासोबत तरी फोनवर बोलते आहे.4 / 9द लव्ह बर्ड, असे कॅप्शन तिने या इन्स्टास्टोरीला दिले होते. 12 तासांपूर्वी चित्रा इतकी आनंदी होती तर 12 तासांत असे काय घडले की, तिने गळफास लावून मृत्यूला पत्करावे, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.5 / 9ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये शुटींग आटोपून चित्रा मध्यरात्री 2.30 वाजता आपल्या हॉटेलमधील रुममध्ये आली. आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि परत आलीच नाही.6 / 9 शुटींगवरुन परतल्यानंतर चित्राने अंघोळीसाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, खूप वेळानंतरही त्या बाथरुममधून बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच हेमंतने दरवाजा ठोठावला.7 / 9 चित्राकडून काहीच प्रतिक्रिया न मिळाल्याने हेमंतने हॉटेल स्टाफला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, डुप्लीकेट चावीने हॉटेल रुममधील तो दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी, सिलींगला चित्राचा मृतदेह लटकलेला आढळून आला.8 / 9स्टार विजय चॅनेलवर प्रसारित होणा-या पांडियन स्टोअर्स या तमिळ मालिकेसाठीचित्राला ओळखले जाते. यामध्ये तिने मुल्लाई ही भूमिका साकारली होती.9 / 9अद्याप चित्राच्या कुटुंबीयांकडून तिच्या मृत्यूबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चित्रा देखील नैराश्याचा बळी ठरल्याचे म्हटले जात आहे.