Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतला करायचंय लग्न, पण आहे ही अट; म्हणाली - जोडीदार असा हवाय जो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 07:00 IST

1 / 7
पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील आघाडाची अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
2 / 7
पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत येत असते.
3 / 7
सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे चाहत्यांना कलाकारांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान आता पूजा सावंतने देखील तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.
4 / 7
एका मुलाखतीत पूजा सावंतने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पूजा घरात मोठी मुलगी असल्यामुळे तिने आजवर सगळ्यांना सांभाळण्याचे काम केले आहे. पण मला असा मुलगा हवाय जो मला सांभाळून घेईल आणि मला कधीच दुखावणार नाही, असेही तिने सांगितले.
5 / 7
या मुलाखतीत पूजाने अभिनय क्षेत्रातील प्रवासातील एक खंतदेखील बोलून दाखवली. ती सांगते की, मला चित्रपट मिळतात पण माझी उंची जास्त असल्यामुळे बऱ्याचदा कामं नाकारली जातात. कथानक वगैरे सगळं आवडलं असलं तरी नायक कोण असणार यावर माझी निवड ठरते. कारण चित्रपटाचा नायक उंच नसेल तर मला रिजेक्ट केलं जातं.
6 / 7
म्हणजे जर माझ्याकडे ५ चित्रपट आले तर त्यातले निवडकच चित्रपट मला करायला मिळतात. आणि मी ज्यांच्यासोबत काम केलं आज ते माझे मित्र झाले आहेत असे पुढे पूजाने सांगितले.
7 / 7
क्षणभर विश्रांती,पोश्टर बॉईज, गोंदण, दगडी चाळ, लपाछपी, विजेता, बोनस चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणाऱ्या पूजाला जंगली चित्रपटातून थेट बॉलिवूड चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली.
टॅग्स :पूजा सावंत