Join us

PHOTOS : अटकेनंतरचे आर्यन खानचे ताजे फोटो, कॅमेरे पाहून उडाला चेहऱ्याचा रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 17:46 IST

1 / 8
शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आर्यनसह तिघांना अटक झाली आहे. यात आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे.
2 / 8
तिघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यादरम्यानचे आर्यनचे फोटो व्हायरल होत आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर तिघांनाही किला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
3 / 8
आर्यन खानला कोर्टात हजर केल्यानंतर एनसीबीकडून त्याची पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
4 / 8
एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली काल मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर एनसीबीनं सापळा रचून छापा टाकला होता.
5 / 8
यात मोठी ड्रग्ज पार्टी उधळून लावण्यात आली आणि एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यात तीन मुलांचाही समावेश आहे. आठ आरोपींकडून चरस, एमडीएमए, एमडी आणि कोकेन जप्त करण्यात आलं होतं.
6 / 8
समोर आलेल्या माहितीनुसार कॉर्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
7 / 8
यात उच्चभ्रू वगीर्यांचा प्रामुख्याने समावेश होता. याप्रकरणी आर्यन खान याचीही चौकशी केली गेली. ड्रग्ज पाटीर्शी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली.
8 / 8
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते.
टॅग्स :आर्यन खानशाहरुख खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो