Join us

'छुपाना भी नहीं आता, दिखाना...', पुन्हा एकदा जान्हवी कपूरच्या गळ्यात बॉयफ्रेंडच्या नावाचा नेकलेस, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:31 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
2 / 10
जान्हवी तिचे नवीन लुक सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधते.
3 / 10
नुकतेच जान्हवीने तिचे डीप नेक ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.
4 / 10
विशेष म्हणजे जान्हवीनं पुन्हा एकदा रूमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या नावाचा हार घातला. तिच्या नेकलेसवर 'शिखू' असे लिहिले होते.
5 / 10
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) रिलेशनशिपमध्ये आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) ती डेट करत आहे.
6 / 10
जान्हवी कपूरचा हार पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एकाने लिहलं, 'छुपाना भी नहीं आता, दिखाना भी नहीं आता'. याआधी जान्हीनं 'मैदान' स्क्रीनिंगला हा नेकलेस परिधान केला होता.
7 / 10
जान्हवी कपूरने आपल्या कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.
8 / 10
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
9 / 10
या लुकसाठी जान्हवीने बोल्ड मेकअप केला. या लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती.
10 / 10
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच आगामी ज्युनिअर एनटीआर, 'देवरा', रामचरण तेजाच्या RC16 या दाक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणार आहे. तर वरुन धवनसोबत ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमात झळकणार आहे.
टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीबॉलिवूड