By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 20:16 IST
1 / 6माजी मॉडेल व अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच ( Natasa Stankovic) याने सोशल मीडियावर हॉट व बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियावर आग लावली आहे. इंस्टाग्रामवर नेहमी बोल्ड फोटोमुळे चर्चेत असलेल्या नताशानं बुधवारी बिकनीवरील फोटो पोस्ट केले आहेत.2 / 6भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिकनं २०२० वर्षाच्या पहिल्याच दिवशी नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करण्याचे जाहीर केले. त्याच्या साखरपुड्याची कल्पना घरच्यांनाही नव्हती. त्याने गुपचूप लग्नही उरकले. मुंबईत एका पार्टित या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. नताशानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांत काम केलं आहे. 3 / 6सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नच बलिये या कार्यक्रमात ती एक्स बॉयफ्रेंड गोनीसोबत सहभाग घेतला होता.4 / 6नताशा आणि हार्दिक हे त्यांच्या मुलगा अगस्त्यासोबत Santorini बेटावर फिरायला गेले आहेत. हार्दिक व नताशा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून अपडेट्स देत आहेत. 5 / 6हार्दिक पांड्यानेही तिच्या फोटोवर इमोजि पोस्ट करून रिअॅक्शन दिली आहे. 6 / 6झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हार्दिक पांड्याचा समावेश नाही. तो आशिया चषक स्पर्धेतून भारतीय संघात पुनरागमन करत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर तो कुटुंबियांसोबत फिरायला गेला आहे.