‘अल्लाह’साठी पाकिस्तानी अभिनेत्रीने सोडली ग्लॅमर इंडस्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 16:10 IST
1 / 9अलीकडे बॉलिवूड अभिनेत्री सना खान हिने ‘अल्लाह’च्या मार्गावर चालण्यासाठी ग्लॅमर इंडस्ट्रीतून संन्यास घेतला. त्याआधी बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिनेही अल्लाच्या नावावर ग्लॅमर इंडस्ट्रीतून संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. आता पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीने असेच इस्लामसाठी अभिनय, मॉडेलिंग सोडण्याचा निर्णय घेतला आहे.2 / 9या पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव आहे जैनब जमील. जैनब ही पाकिस्तानी आघाडीची अभिनेत्री, मॉडेल व टीव्ही होस्ट आहे.3 / 9जैनबने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली. मी अभिमानाने ही घोषणा करते की, मी अॅक्टिंग व मॉडेलिंग करिअर सोडतेय. अल्लाहने मला इस्लामबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी निवडले आहे, असे तिने जाहीर केले.4 / 9यानंतर तिने इन्स्टास्टोरीवरही याबद्दल लिहिले. तिने लिहिले, अॅक्टिंगमध्ये माझे मन रमत नव्हते. हा निर्णय मी यापूर्वीच घ्यायला हवा होता.5 / 9स्वत:ची धार्मिकता वाढवा. हे सोपे काम नाही. राक्षसवृत्ती वाढत आहे आणि धार्मिकवृत्तींना मार्गातून दूर करण्यासाठी टपलेल्या आहेत. तेव्हा सावध व्हा, असेही तिने लिहिले आहे.6 / 9जैनबने स्वमर्जीने ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. पण तिच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.7 / 9काही जण तिच्या या निर्णयाचे स्वागत करत आहेत तर काहींनी तिचा हा निर्णय चुकीचा ठरवला आहे.8 / 9जैनब ही पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 13 मार्च 1989 रोजी जन्मलेल्या जैनबने मॉडेलिंगपासून करिअरची सुरूवात केली होती.9 / 9जैनबने जिओ टीव्हीवरच्या सदा सुखी रहो, ससुराल मेरी बहन का, मनचली, मिल के हम ना मिले, आपके कनीज अशा शोमध्ये काम केले आहे.