'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन ते 'राजी' अन् 'बेताब'; जिथे हल्ला झाला त्या पहलगामची बॉलिवूडलाही भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:38 IST
1 / 10जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. सर्वच स्तरातून या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. स्वर्गसुख देणाऱ्या काश्मीरला नरक यातना भोगाव्या लागत आहेत. 2 / 10निसर्गसौंदर्य असणाऱ्या काश्मीरची भुरळ पर्यटकांप्रमाणेच बॉलिवूडलाही पडली. 3 / 10अनेक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग काश्मीरमध्ये झालं आहे. यामध्ये सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमादेखील आहे. 4 / 10जिथे दहशतवादी हल्ला झाला त्या भागात 'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन शूट करण्यात आला आहे. 5 / 10पहलगाममधील बेताब व्हॅली येथे या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. तर मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या बैसरन मॅडोमध्ये सिनेमाचा काही भाग शूट करण्यात आला आहे. 6 / 10शाहिद कपूरच्या 'हैदर' सिनेमाचं शूटिंगही पहलगाम व्हॅलीमध्ये झालं आहे. 7 / 10१९८३ साली पहलगाम व्हॅलीमध्ये 'बेताब' सिनेमाचं शूटिंग झालं होतं. त्यानंतर या व्हॅलीला बेताब व्हॅली असं नाव पडलं. या बेताब व्हॅलीतच 'बॉबी', 'रोटी' आणि 'खामोश' या बॉलिवूड सिनेमांचं शूटिंगही झालं आहे. 8 / 10आलिया भट मुख्य भूमिकेत असलेल्या 'हायवे' आणि 'राझी' या दोन्ही सिनेमांचा काही भाग पहलगाम व्हॅलीत शूट करण्यात आला आहे. 9 / 10शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या 'जब तक है जान' सिनेमात पहलगाम व्हॅलीतील निसर्गसौंदर्य पाहायला मिळालं आहे. 10 / 10विजय देवराकोंडा आणि समांथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत असलेल्या खुशी या साऊथ सिनेमाचं शूटिंगही पहलगाममध्ये झालं आहे.