Join us  

Oscar 2023: 'नाटू नाटू'ने ऑस्कर जिंकल्यानंतर RRRच्या टीमची समोर आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- शब्दात या क्षणाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:38 AM

1 / 5
भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीत नाटू नाटूला हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारताना एमएम कीरवाणी अत्यंत उत्साही दिसत होते. (फोटो: RRR Movie Team)
2 / 5
मेकर्सनी RRR चित्रपटाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले- 'आम्ही धन्य आहोत की RRRमधील नाटू-नाटू या गाण्याला भारताचा पहिला ऑस्कर सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. या क्षणाचे कोणतेही शब्द वर्णन करू शकत नाहीत. जगभरातील आमच्या सर्व चाहत्यांना हे समर्पित करत आहे. धन्यवाद. जय हिंद. ' (फोटो: The Academy)
3 / 5
चित्रपटाचा मुख्य अभिनेता ज्युनियर एनटीआर यानेही 'नाटू नाटू'ला ऑस्कर जिंकल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला- 'माझ्याकडे आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. हा केवळ आरआरआरचा विजय नसून एक देश म्हणून भारताचा विजय आहे. भारतीय सिनेमा किती पुढे जाऊ शकतो याची ही फक्त सुरुवात आहे. एम एम कीरावानी आणि चंद्रबोस यांचं अभिनंदन. (फोटो: RRR Movie Team)
4 / 5
राम चरणनेही 'नाटू नाटू'ला ऑस्कर जिंकल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, आम्ही जिंकलो!! भारतीय सिनेमा म्हणून आम्ही जिंकलो!! देश म्हणून आम्ही जिंकलो!! ऑस्कर पुरस्कार घरी घेऊन येतोय आहे! (फोटो: ANI)
5 / 5
'नाटू नाटू' गाण्यानं फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.
टॅग्स :ऑस्करआरआरआर सिनेमाराम चरण तेजा