PHOTOS : नुसरत जहाँने शेअर केले बेडरूममधील फोटो, क्षणात झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:25 IST
1 / 8नुसरत जहाँ हे अभिनय आणि राजकारणातलं मोठं नाव आहे. नुसरत ही बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. शिवाय तृणमूल काँग्रेसची खासदार आहे.2 / 8नुसरत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. सर्वाधिक चर्चा होते ती तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंची. आता ती पुन्हा एकदा अशाच फोटोंमुळे चर्चेत आली आहे.3 / 8नुसरतने आता बेडरूममधील फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यात ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय.4 / 8बेडरूममधील फोटो शेअर करण्याची अर्थात तिची ही पहिली वेळ नाही. याआधीही असे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत.5 / 8 नुसरत सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.6 / 8 खासदार असण्यासोबतच नुसरत अभिनेत्रीदेखील आहेत. नुसरतने खिलाडी, शोत्रु, खोका ४२०, जमाई, लव एक्स्प्रेस आणि क्रिसक्रोस या सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.7 / 8नुसरतने नुकताच मुलाला जन्म दिला. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती.8 / 8नुसरतने 2019 मध्ये तुर्कीमध्ये निखील जैनसोबत लग्न केलं होतं. मात्र काही काळातच दोघांनी काडीमोड घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता नुसरत बंगाली अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.