Join us

किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरच नाही तर मराठी कलाविश्वातील हे ६ जोडपे बांधणार लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:11 IST

1 / 8
सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच रेश्मा शिंदेने बॉयफ्रेंड पवनसोबत लग्न केले. त्यानंतर आता आणखी काही कलाकार लग्नबेडीत अडकणार आहेत.
2 / 8
हेमल इंगळेचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा पार पडला. त्यानंतर तिच्या बॅचरल पार्टीचीही नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली. अशातच आता अभिनेत्रीच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत. ती लवकरच रोनकसोबत लग्न करणार आहे.
3 / 8
आई कुठे काय करते मालिकेत आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.
4 / 8
१९ डिसेंबर, २०२१ मध्ये दिव्या पुगावकर हिचा तिलक समारंभ पार पडला होता. ती अक्षय घरत सोबत लग्न करणार आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.
5 / 8
'बिग बॉस मराठी' फेम 'कोकण हार्टेड गर्ल' उर्फ अंकिता प्रभू वालावलकर देखील लग्नगाठ बांधणार आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्यासोबत सातफेरे घेणार आहे.
6 / 8
अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफळापूरकर लवकरच लग्न करणार आहेत. श्रेयाच्या ग्रहमखचे फोटो समोर आले आहेत.
7 / 8
अभिनेता अंबर गणपुळे अभिनेत्री शिवानी सोनारशी लग्न करणार आहे. नुकतीच अंबर आणि शिवानी यांची बॅचलर पार्टी झाली.
8 / 8
किरण गायकवाड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.
टॅग्स :किरण गायकवाड