दीपिकाच नाही तर आलिया-अनुष्कासह या अभिनेत्रींनी घातली होती भगवी बिकिनी, तेव्हाही वाद झाला होता? पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 17:22 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहे. दीपिका पादुकोणने पठाण चित्रपटामधील बेशर्म रंग गाण्यामध्ये भगवी बिकिनी घातल्याने ट्रोल झाली आहे. मात्र भगव्या रंगाची बिकिनी दीपिकाच्या आधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी भगव्या रंगाची बिकिनी वापरली आहे.2 / 6कॅटरिना कैफ हिने सन २०१६ मध्ये बार बार देखो चित्रपटामध्ये कॅटरिना कैफ हिने ऑरेंज कलरची बिकिनी घातली होती. मात्र तेव्हा कॅटरिना कैफ ट्रोल झाली नव्हती, तक तिचं खूप कौतुक झालं होतं. 3 / 6प्रियंका चोप्रा नेहमी सोशल मीडियावर सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करत असते. प्रियंका चोप्रानेसुद्धा सोशल मीडियावर भगव्या रंगांच्या बिकिनीमध्ये आपला बोल्ड फोटो शेअर केला आहे.4 / 6दीपिका पादुकोणच्या आधी अनुष्का शर्माही भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती. सन २०१९ मध्ये अनुष्का शर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर समुद्रकिनाऱ्यावरील आपला बिकिनी फोटो शेअर केला होता. ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये अनुष्का शर्मा सुंदर दिसत आहे.5 / 6आलिया भट्टसुद्धा दीपिका पादुकोणच्या आधी ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये दिसली आहे. आलिया भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये क्युट दिसत आहेत. 6 / 6टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री आमना शरीफ हिनेही दीपिका पादुकोणच्या आधी ऑरेंज रंगाच्या बिकिनीमध्ये फिगर प्लाँट केला होता.