By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 10:29 IST
1 / 10मिस इंडिया वर्ल्ड 2024 (Miss India World 2024) चा खिताब यंदा निकिता पोरवालने पटकावला आहे. 2 / 10मुंबईत 'मिस इंडिया वर्ल्ड' स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. २०२३ ची मिस इंडिया वर्ल्ड ठरलेल्या नंदिनी गुप्ताने निकिताच्या डोक्यावर क्राऊन घातला. 3 / 10निकिताने आपल्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली याचा तिच्या कुटुंबाला प्रटंड अभिमान वाटतोय.4 / 10या सौंदर्यस्पर्धेत रेखा पांडे ही फर्स्ट रनर अप तर आयुषी ढोलकिया सेकंड रनर अप ठरली. 5 / 10 मिस इंडिया वर्ल्ड 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. ही स्पर्धा 16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील महालक्ष्मी येथील प्रसिद्ध स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आली होती. 6 / 10'मिस इंडिया वर्ल्ड' जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना निकिता म्हणाली, 'जेव्हा मी मागे वळून पाहते आणि आता ज्याठिकाणी पोहोचले याचा विचार करते, तेव्हा मला जाणवतं की माझ्यात भविष्य घडवण्याची ताकद आहे'.7 / 10निकिताने टीव्ही अँकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती अभिनय आणि रंगभूमीकडे वळली. निकिताने नाटत आणि चित्रपटातही काम केलं आहे. निकिताला वाचन, लेखन, चित्रकला आणि चित्रपट पाहण्याची आवड आहे.8 / 10निकिता ही मध्य प्रदेशमधील उज्जैन येथून आहे. निकिता पोरवाल यांनी महाराजा सयाजी राव विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.9 / 10आता 'मिस इंडिया वर्ल्ड' चा किताब जिंकल्यानंतर आता निकिता 'मिस वर्ल्ड' या सौंदर्यस्पर्धेसाठी तयारी करणार आहे. 10 / 10यापुर्वी भारतातून ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखे (1999), प्रियांका चोप्रा (2000) आणि मानुषी छिल्लर (2017) यांनी याआधी मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केलेला आहे.