Sonalika Joshi: ना साधी साडी, ना सिंपल लाईफस्टाईल, प्रत्यक्षात खूपच बोल्ड आहेत तारक मेहतामधील माधवी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 15:28 IST
1 / 6तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सोनालिका जोशी माधवी भिडेंची भूमिका निभावत आहेत. तसेच त्यांची मराठी महिलेची भूमिका चांगलीच पसंत केली जात आहे. या मालिकेत सोनालिका अगदी साध्या रूपात दिसतात. मात्र प्रत्यक्ष खऱ्या जीवनात मात्र त्या खूप वेगळी आणि बोल्ड आहेत. 2 / 6सोनालिका जोशी ह्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या १४ वर्षांपासून काम करत आहेत. या मालिकेत त्या नेहमी एकसारख्या लूकमध्ये दिसतात. मात्र प्रत्यक्ष जीवनात सोनालिका ह्या खूप वेगळ्या आहेत. 3 / 6सोनालिका जोशी यांच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर त्यांची स्टाइल खूप बदललेली दिसत आहे. त्या खूप स्टायलिशसुद्धा आहेत. तसेच त्या ग्लॅमरसही आहेत. कधी शॉर्ट ड्रेस घालून, तर कधी बॉडीकॉर्न आऊटफिटमध्ये सोनालिका यांनी खूप पोझ दिल्या आहेत. 4 / 6रील लाईफमध्ये सोनालिका लोणचं-पापड विकतात. मात्र रियल लाईफमध्येही त्या बिझनेस वुमन आहेत. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्या बिझनेसचा कोट्यवधीचा टर्नओव्हर आहे. मात्र ते कितपत खरं आहे याबाबत माहिती नाही. 5 / 6सोनालिका जोशी यांची लक्झरियस लाइफस्टाइल पाहून कुठाचेही डोळे विस्फारू शकतात. महागड्या गाड्या, सुंदर घर आणि फिरण्याची आवड. त्यामुळे सोनालिका कुटुंबीयांसोबत खूप एन्जॉय करतात. 6 / 6सोनालिका जोशी ३बीएचके घरात राहतात. तसेच त्यांच्याकडे टोयोटा इटियॉसपासून ते एमजी हेक्टरसारख्या गाड्या मालकीच्या आहेत. त्यांच्या मुलीचं नाव आर्या जोशी आहे.