Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! नेहा पेंडसेच्या लग्नाची उडवली होती खिल्ली, यावर आता अभिनेत्रीने सोडले मौन, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 07:00 IST

1 / 10
अभिनेत्री नेहा पेंडसे मागील वर्षी जानेवारी महिन्यात शार्दुल ब्याससोबत लग्नबेडीत अडकली होती. शार्दुलचे दोनदा घटस्फोट झाला आहे आणि त्याला दोन्ही लग्नातून एक एक मुले आहेत. त्यामुळे बऱ्याच मोठ्या कालावधीपासून नेहा पेंडसेच्या लग्नाची खिल्ली उडवली आहे.
2 / 10
एका मुलाखतीत नेहाने ट्रोलिंगवर आपले मत व्यक्त केले आहे. ती म्हणाली की, आता ट्रोल्सकडे ती कानाडोळा करायला शिकली आहे.
3 / 10
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहा पेंडसेने सांगितले होते की, तिच्या लग्नाची खिल्ली उडवणे थांबलेले नाही. मला वाटते की ट्रोलिंग कधीच थांबू शकत नाही. ते आपल्याला ट्रोल करण्यासाठी कारण शोधत असतात. मात्र मी आणि माझ्या नवऱ्याने त्याच्याकडे कानाडोळा करणे शिकले आहे.
4 / 10
ती पुढे म्हणाली की, सुरूवातीला मी ट्रोलिंगमुळे माझा नवरा त्रस्त व्हायचा कारण या सर्व गोष्टींची त्याला सवय नाही पण आता काळानुसात ते हेदेखील शिकले आहेत आता ट्रोलिंगचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही.
5 / 10
सध्या नेहा पेंडसे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर हैमध्ये काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती अनिता भाभीची भूमिका साकारते आहे. तिच्या या भूमिकेला चांगली दाद मिळते आहे.
6 / 10
अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी शिवाय हिंदी मालिका व चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
7 / 10
मराठीबरोबरच हिंदीमध्ये 'मे आय कमिंग मॅडम' नंतर नेहा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये 'प्रेझेंटर'म्हणून झळकली होती.
8 / 10
नेहाने आजवर मराठी आणि हिंदी सोडून दाक्षिणात्य भाषेत तसेच अन्य 7 विविध भाषांमध्ये काम केले आहे.
9 / 10
नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
10 / 10
वेस्टर्न आऊटफिटप्रमाणेच पारंपरिक अंदाजातही नेहा खूप सुंदर दिसते.
टॅग्स :नेहा पेंडसे