1 / 14बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली. रोहनप्रीत सिंगसोबत तिने लग्नगाठ बांधली.2 / 14नेहाच्या शाही लग्नाची जोरदार चर्चा झाली. या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झालेत. आता नेहाने तिच्या लग्नाचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.3 / 14नेहाने गुरूद्वारात झालेल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.4 / 14नेहाने गुरुद्वारा वेडिंगमध्ये सब्यसाचीने डिझाईन केलेला लहंगा परिधान केला होता. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘लोक सब्यसाचीने डिझाईन केलेले कपडे परिधान करण्यासाठी मरतात. हे आऊटफिट आम्हाला सब्यसाचीने गिफ्ट केले. स्वप्न खरी होतात. पण कष्ट घेतले तरच...’5 / 14नेहाने लग्नात पिंक कलरचा लहंगा कॅरी केला होता. यावर जरदोजी आणि मीनाकारी वर्क होते. तिचे दागिणेही सब्यसाचीने डिझाईन केलेले होते.6 / 14 नेहाचा पती रोहनप्रीत सिंगदेखील गायक आहे. अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते. 7 / 14लग्नाला नेहा आणि रोहनप्रीतचे जवळचे नातेवाईकच उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला या लग्नाला हजर होती. 8 / 14नेहाच्या रोका सेरेमनीपासून हळदी आणि मेहंदी सेरेमनीच्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटस करत शुभेच्छा दिल्या होत्या. 9 / 14नेहाच्या लग्न सोहळ्यात खास लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. यात उर्वशी ढोलकिया, पंजाबी गीतकार बानी संधू, जस्सी लोहका आणि अवनीत कौर ही मंडळी उपस्थित होती.10 / 14गेल्या काही दिवसांपासून नेहा व रोहनप्रीतच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 11 / 14‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता.12 / 14आपल्या आवाजाने तरूणाईला वेड लावणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत असते.13 / 14कधीकाळी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. अनेक प्रयत्नानंतर नेहा ब्रेकअपच्या या दु:खातून बाहेर आली.14 / 14यानंतर ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर असा काही ड्रामा रंगला की नेहा उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत लग्न करणार, अशा चर्चा रंगल्या.