Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर क्रिकेटपटू Prithvi Shaw ची नवी मैत्रिण निधी नक्की आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 14:32 IST

1 / 9
Prithvi Shaw Nidhhi Tapadiaa: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ ने एका मिस्ट्री गर्लसोबत पोज देत इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
2 / 9
पृथ्वी शॉ ने याच स्टोरीमध्ये लिहिले की, तो तिच्याकडून नवरात्री दरम्यान गरबा कसा करायचा हे शिकत आहे.
3 / 9
ही 'मिस्ट्री गर्ल' नेमकी कोण आहे या प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. त्याचं उत्तर आपण आता जाणून घेणार आहोत.
4 / 9
पृथ्वी शॉ च्या या नव्या मैत्रिणीचं नाव आहे निधी तापडिया. क्रिकेट चाहत्यांमध्ये ती फारशी लोकप्रिय नसली तरी आम्ही तुम्हाला पृथ्वी शॉ च्या या नवीन मैत्रिणीबद्दल माहिती देतो.
5 / 9
निधी तापडिया आजकाल नवरात्री दरम्यान भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला गरबा स्टेप्स शिकवत आहे. क्रिकेटरने एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला.
6 / 9
हा फोटो जेव्हापासून पृथ्वी शॉ ने पोस्ट केला तेव्हापासून त्यांच्या कथित रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांनाही सोशल मीडियावर उधाण आहे. जाणून घेऊया, निधी तापडिया नक्की आहे तरी कोण?
7 / 9
निधी ही एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. निधी तापडिया ही एक इंटरनेट आणि इंस्टाग्राम सेन्सेशन आहे. तिचे सोशल मीडिया अॅपवर 102K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या सौंदर्यामुळे आणि प्रतिभेमुळे ती तिच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
8 / 9
निधी तापडिया अनेक जाहिरातींमध्ये दिसले. तिने आतापर्यंत लोकप्रिय ब्रँड असलेल्या Elle India, मान्यवर मोहे यांच्यासाठी जाहिरातींमध्ये मॉडेलिंग केले आहे. पृथ्वी शॉची नवीन मैत्रीण निधी तापडिया देखील भारतीय टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेल्या CID या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये दिसली आहे.
9 / 9
निधी पहिल्यांदा तिच्या 'जट्टा कोका' या गाण्यामुळे प्रकाशझोतात आली. प्रख्यात पंजाबी गायक कुलविंदर बिल्ला याचे ते गाणे होते. त्यानंतर तिने अनेकविध कामे केली आहेत. अलीकडेच तरुणांचा लाडका टोनी कक्कर याच्या 'किस यू' या म्युझिक व्हिडिओमध्ये अतिशय मॉडर्न अंदाजात निधी दिसली आहे.
टॅग्स :ऑफ द फिल्डपृथ्वी शॉसेलिब्रिटीव्हायरल फोटोज्